मोठी बातमी! नवनीत राणांना दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून जात प्रमाणपत्र वैध

मोठी बातमी! नवनीत राणांना दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून जात प्रमाणपत्र वैध

Navneet Rana Cast Certificate hearing in Supreme Court : अमरावती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या (Navneet Rana) जातवैधता प्रमाणपत्र प्रकरणात आज सुप्रीम कोर्टाने निकाल (Supreme Court) दिला. न्यायालयाने नवनीत राणा यांचे प्रमाणपत्र वैध ठरवले. या निर्णयामुळे नवनीत राणा यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघात महायुतीने विद्यमान खासदार नवनीत राणा यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. नवनीत राणा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. याच दिवशी राणांच्या जातवैधता प्रमाणपत्र प्रकरणात निकालही आला आहे.

पाच कारणे… लोकसभेला अमरावतीमध्ये नवनीत राणांचा गेम होणार!

मुंबई जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य जात प्रमाणपत्र दिले. त्यानंतर छाननी समितीने कागदपत्रांचा रीतसर विचार केला आणि नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचे पालन करून निर्णय दिला. त्यामुळे अनुच्छेद 226 अंतर्गत कोणत्याही हस्तक्षेपास हे प्रमाणपत्र पात्र ठरत नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाचा निकाल बाजूला ठेवला जात आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना निरीक्षण नोंदविले.

महायुतीने यंदा मतदारसंघातील विरोध झुगारून नवनीत राणा यांना उमेदवारी दिली. या मतदारसंघावर शिंदे गटाचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी दावा केला होता. त्यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांनी अपक्ष लढण्याची तयारी केली आहे. तर दुसरीकडे प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनीही या मतदारसंघात उमेदवार दिला आहे. या दोन्ही नेत्यांची बंडखोरी कायम राहिली तर नवनीत राणा यांना अनेक अडचणी निर्माण होणार आहेत. या शक्यता माहिती असतानही भाजपने राणा यांनाच उमेदवारी दिली. इतकेच नाही तर त्यांचा भाजपात पक्षप्रवेशही घडवून आणला.

यानंतर आता नवनीत राणा यांनी प्रचाराला सुरुवात केली. मात्र त्याआधाीच शिंदे गटाचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. याआधी हायकोर्टाने राणांचे जात प्रमाणपत्र 2021 मधे अवैध ठरवलं होतं, त्यानंतर नवनीत राणा यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टाने त्यावेळी हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. यानंतर या प्रकरणात सुनाणवणी होऊन अंतिम निकाल देण्यात आला.

काय आहे प्रकरण ?

अमरावती लोकसभा मतदारसंघ SC अर्थात अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. नवनीत राणा (Navneet Rana) यांनी गत दोन्ही लोकसभा निवडणुका मोची जातीच्या जात प्रमाणपत्राआधारे लढविल्या आहे. पण 2021 मध्ये त्यांच्या जात प्रमाणपत्रावर खासदार आनंदराव अडसूळ (Anand Rao Adsul) यांनी आक्षेप घेतला. उच्च न्यायालयात खटला चालला आणि त्यांचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याचा न्यायालयाने निर्णय दिला. राणा यांनी तातडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. पण आता सर्वोच्च न्यायालयातही राणा यांचे जात प्रमाणपत्राबाबत निकाल दिला आहे.

वडिलांच्या पंजाबमधील चामार जातीच्या नोंदीच्या आधारावर महाराष्ट्रात ‘मोची’ जातीचे नवीन प्रमाणपत्र दिलं जाऊ शकत नाही, असे राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले. ज्या शिंदे सरकारच्या बाजूने राणा सध्या आहेत, त्याच सरकारने अशी भूमिका घेतल्यामुळे आता नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात आली आहे. राणाच्या वडिलांच्या जात प्रमाणपत्रानुसार ते फक्त शीख आहेत. ते मागासवर्गीय नाहीत. सोबतच त्यांच्या आईचे रेशनकार्डही इंटरपोलेटेड असल्याचे आढळून आले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज