Sandeep Deshpande : भावी पंतप्रधानांना शुभेच्छा, बुरा ना मानो होली है, ठाकरेंना खोचक टोला

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 07T110110.064

मनसेचे ( MNS )  नेते संदीप देशपांडे ( Sandeep Deshapande )  यांनी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदाचे दावेदार असतील असे म्हटले होते. यावरुन देशपांडे यांनी खोटक ट्विट केले आहे. भावी पंतप्रधानांना शुभेच्छा, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे हे पंतप्रधान होतील, असे विधान केले होते. त्यावर देशपांडेंनी ट्विट केले आहे. भावी पंतप्रधानांना शुभेच्छा.भंकस वाटली असेल तर माफ करा “पण बुरा ना मानो होली है, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. तसेच, आता तुमच्याशी हिंदीतच बोललं पाहिजे तुम्ही आता पंतप्रधान होणार मज्जा आहे बाबा एका माणसाची, असेही ते म्हणाले आहेत.

Amol Mitkari : पक्षाने संधी दिली तर लोकसभा लढवणार

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी 2024 साली उद्धव ठाकरे हे पंतप्रधान होऊ शकतात असे विधान केले होते. राजकारणात काहीही घडू शकतं. उद्धव ठाकरे हा एक उत्तम चेहरा आहे. ज्यापद्धतीने महाविकास आघाडीने ठरवले व उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. उद्धव ठाकरे हा एक मोठा चेहरा आहे. ते हिंदुत्ववादी आहेत. त्यामुळे त्यांचा नावाचा विचार भविष्यात आमचे सहकारी करु शकतात, असे राऊत म्हणाले होते.

दरम्यान काही दिवसांपूर्वी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर मुंबईतील शिवाजी पार्क मैदान येथे हल्ला करण्यात आला. ते सकाळी मॉर्निंग वॉक करत असताना अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला केला. यानंतर मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी या हल्ल्यामागे  आदित्य ठाकरे व संजय राऊत असल्याचा आरोप केला होता. तसेच ठाकरे गटाचे नेते वरुण सरदेसाईंचे नाव देखील काही मनसेच्या नेत्यांनी घेतले आहे.

Sanjay Shirsat हे असले कसले शिवसैनिक… इम्तियाज जलील यांनी उडवली खिल्ली!

आदित्य ठाकरे यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी हे आरोप केले जातात, असे ते म्हणाले आहेत. दरम्यान संदीप देशपांडे यांनी पोलिसांची सुरक्षा नाकारली असून ज्यांनी हल्ला केला त्यांना सुरक्षेची गरज असल्याचे ते म्हणाले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube