अजितदादांनी फटकारताचं राऊत बॅकफुटवर म्हणाले; ते मुख्यमंत्री…

अजितदादांनी फटकारताचं  राऊत बॅकफुटवर  म्हणाले; ते मुख्यमंत्री…

Sanjay Raut On Ajit Pawar :  शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा येथे 23 एप्रिल रोजी सभा होणार आहे. पण या सभेच्या आधीपासूनच राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे जळगाव येथे दाखल झालेले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत विविध विषयांवर भाष्य केले.

यावेळी राऊतांना अजितदादा हे भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री होणार का असा प्रश्नदेखील विचारण्यात आला. त्यावर देखील त्यांनी भाष्य केले आहे. मी त्यांचे एक वक्तव्य ऐकले आहे. ते राष्ट्रवादीत राहणार आहेत व ते राष्ट्रवादीचेच आहेत. त्यामुळे मी असे उत्तर दिले म्हणजे मी कुणाची वकिली करतो असे नाही तर, मी महाविकास आघाडीची वकिली करतो, असे राऊत म्हणाले आहेत.

धमकीचा फोन! आमदार खोसकर रडत रडत म्हणाले…यांच्या हातून मरण्यापेक्षा मी आत्महत्या…

 

तसेच मुख्यमंत्री व्हायला कुणाला आवडणार नाही. अजित पवारांमध्ये मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे. गेली अनेक वर्ष ते राजकारणामध्ये काम करत आहेत. अनेक वर्षांपासून ते मंत्री आहेत. सर्वाधिकवेळा उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम त्यांनी केला आहे. त्याच्यामुळे अनेकांना वाटतं की आपण मुख्यमंत्री व्हावं. अनेकजण हे लायकी नसताना मुख्यमंत्री होतात, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना नाव न घेता टोला लगावला आहे.

याआधी दोन अजित पवार हे भाजप सोबत जाणार असल्याचा चर्चा सुरु होत्या. यावरुन अजित पवार व संजय राऊत यांच्यामध्ये शाब्दिक चकमक देखील पहायला मिळाली. तेव्हा अजित पवारांनी आपल्या नेहमीच्या बेधडक स्टाईलमध्ये राऊतांना चांगलेच फटकारले. यानंतर आता राऊतांने हे विधान केले आहे.

राम शिंदेंनी विखेंना आणले टेन्शन; नगरमधून लोकसभा लढण्याची तयारी

दरम्यान, संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील यांच्या जोरदार निशाणा साधला आहे. तसेच या सभेला जळगाव, पाचोरा,रावेल या ठिकाणाहून मोठ्यासंख्येने शेतकरी व शिवसैनिक येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच कोण गुलाबराव त्याला विसरा आता. काही वर्षांपूर्वी गुलाबो गँग नावाचा सिनेमा आला होता, असे म्हणत त्यांनी गुलाबरावांवर निशाणा साधला आहे

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube