Sanjay Raut : बांधावर पिकं आडवी झाली आणि हे रंग खेळत आहेत, राऊतांचा निशाणा

Sanjay Raut : बांधावर पिकं आडवी झाली आणि हे रंग खेळत आहेत, राऊतांचा निशाणा

मुंबई  :  ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut )  यांनी ट्विट करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis )  यांच्यावर निशाणा साधला आहे. काल राज्यात धुळवडीच्या निमित्ताने सर्वत्र रंग खेळण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील रंग खेळत होळी साजरी केली आहे. पण दुसरीकडे अवकाळी पाऊस व गारपीटीने शेतकऱ्यांचे हाल झालेले आहेत. यावरुन राऊतांनी फडणवीसांवर टीका केली आहे.

विरोधक भांग प्यायले असे श्रीमान देवेंद्र फडणवीस म्हणतात,  हा सुध्दा नशेचा अतिरेकी आहे, असे म्हणत राऊतांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. बांधावर पिकं आडवी झाली आहेत.  शेतकऱ्यांच्या आयुष्याची धूळधाण झाली आणि सरकार धुळवडीच्या रंगात नाहून निघालं, ही सत्तेची चढलेली भांग नाहीतर काय?, असे म्हणत त्यांनी राऊतांना फडणवीसांवर जोरदार निशाणा साधला आहे.

होळीच्या निमित्ताने काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी रंगपंचमी साजरी केली. यावेळी फडणवीसांनी विरोधक भांग प्यायले आहेत, असे ते म्हणाले होते. यावरुनच राऊतांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. राज्यात सध्या अवकाळी पाऊसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात गारपीट देखील झाल्याने उभे पिके आडवी झाली आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी त्याबाबत पंचनामे करायचे आदेश दिले आहेत.

Sanjay Raut ‘त्या’ वक्तव्यावर ठाम, ‘माझे विधान एका विशिष्ट गटापुरते मर्यादित’

दरम्यान संजय राऊत यांना विधीमंडळाने हक्कभंग कारवाईची नोटीस दिली आहे. यावर देखील त्यांनी भाष्य केले आहे. संजय राऊत म्हणाले, हक्कभंगासंदर्भात संसद, विधीमंडळाची एक प्रक्रिया असते. जेव्हा मला हक्कभंगाची नोटीस मिळाली तेव्हा मी मुंबईत नव्हतो. त्यामुळे मी उत्तर देऊ शकलो नाही. विधीमंडळाला देखील दोन दिवस सुट्ट्या होत्या. आज विधीमंडळ सुरु झाले आहे. आमच्या विधीमंडळातील सहकाऱ्यांची चर्चा करीन आणि त्यांची काय प्रोसेस आहे ते पाहून नक्कीच उत्तर दिले जाईल, असे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube