Sanjay Raut : सरकार गेंड्याच्या कातडीचं, त्यांना मन असतं तर…

Sanjay Raut : सरकार गेंड्याच्या कातडीचं, त्यांना मन असतं तर…

Sanjay Raut On Shinde-Fadanvis: खारघरमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी उपस्थित श्रीसदस्यांना उष्मघाताचा त्रास जाणवू लागला. उष्माघातामुळे 16 श्रीसदस्यांचा मृत्यू झाला होता. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते. त्यावर आता पुन्हा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे.

राऊत म्हणाले खारघर घटनेच्या बाबतीत शिंदे-फडणवीस सरकारसाठी असंवेदनशील हा शब्द कमी आहे. हे सरकार गेंड्याच्या कातडीच आहे. त्यांनी मन आणि ह्रजय असतं तर त्यांनी उष्माघातामुळे 16 श्रीसदस्यांचा मृत्यू झाला. हे प्रकरण त्यांनी अशा निर्दयीपणे पैशाच्या जोरावर दडपलं नसत. ज्याप्रकारे गुन्हा दाखल व्हायला हवा होता. चौकशी व्हायला हवी होती. तसेच सदोष मनुष्यवधाबद्दल सरकराने प्रायश्चित्त घ्यायाला हवं होत. कारण सरकारला पैसा आणि सत्तेची मस्ती आहे. अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे.

Sanjay Shirsat : वज्रमुठ सभेत अजित पवार फक्त शरीराने, त्यांच्या मनात काय ते 2-3 दिवसांत कळेल

दरम्यान याच घटनेवरून आता सत्ताधाऱ्यांच्या चिंतेत भर पाडणारी बातमी समोर आली आहे. या दुर्घटनेबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

तसेच या याचिकेत महाराष्ट्र भूषण सोहळ्यासाठी खर्च केलेले 14 कोटी रुपये आयोजकांकडून वसूल करण्याची मागणी करण्यात आली आहे. राजकीय फायद्यासाठी 10 लाख लोकांना कार्यक्रमासाठी बोलावण्यात आल्याचा दावा याचिकेत करण्यात आलाय. व्हीआयपी पाहुणे एसीमध्ये जेवले, तर लोकांना मरण्यासाठी सोडून दिलं, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

त्यांनी यावेळी पंतप्रधान मोदींवरही टीका केली आहे. ते म्हणाले, महाराष्ट्र अस्थिर दिसत आहे. याला पूर्णपणे जबाबदार पूर्ण सत्ता आपल्या हाती घेणारी हुकूमशाही प्रवृत्ती जबाबदार आहे. प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यांना संविधानांवर अजिबात प्रेम नाही. रडणारा प्रधानमंत्री हा प्रथम देशाने पाहिला. टीका सर्व प्रधानमंत्र्यांना सहन करावी लागली होती. पण कोणीही जाहीर सभेत जाऊन मत मागण्यासाठी रडले नाहीत. तसेच मनकी बातची देशाला नाही भारतीय जनता पक्षाला गरज आहे. ती देशाच्या मन की बात नव्हती ती एका पक्षाच्या मन की बात होती. देशावर प्रेम असणं गरजेच आहे. पण खुर्ची वाचवण्यासाठी संविधानाची हत्या होत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube