Maharashtra Politics: ‘बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार’…? शहाजी बापू पाटील यांचा संजय राऊतांना टोला

Maharashtra Politics: ‘बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार’…? शहाजी बापू पाटील यांचा संजय राऊतांना टोला

सांगोला : आताच्या घडीला लोकसभा निवडणूक झाली, तर जनमताचा कौल कुणाच्या बाजूने असेल, याचा एक सर्व्हे घेण्यात आला. सीव्होटरने घेतलेल्या सर्व्हेमुळे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. राजकारणात वारस हा विचारांचा ठरत असतो. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे राजकीय आणि वैचारिक दृष्ट्याच बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे वारसदार आहेत. हे महाराष्ट्रातील जनतेने स्वीकारले आहे. त्यामुळे बाळासाहेबांचे तैलचित्र सभागृहात लावून वारसदार होत नाही, हे संजय राऊत (Sanjay Raut) यांचे मत चुकीचे आहे, असा टोलाही शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांनी लगावला. तसेच राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असेही पाटील म्हणाले.

भाजप-शिंदे गटाने हा सर्व्हे फेटाळून लावला असून, महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) नेते यावरून भाजप-शिंदे गटावर टीका करत आहेत. यातच आता सध्या देशाला नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची गरज आहे. मात्र भविष्यामध्ये निश्चितच पंतप्रधानपदाला न्याय देण्याची क्षमता आणि शक्ती नितीन गडकरी यांच्यामध्येच आहे, असे मोठे विधान शिंदे गटातील आमदाराने केले आहे.

भाजप विरोधात जनमत आहे हे शरद पवार साहेबांचे मत व्यक्तिश: आपणास मान्य नाही. भाजप आणि पंतप्रधान मोदींच्या कारभाराविषयी जनता समाधानी आणि सुखी आहे, असे शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रात्रंदिवस जनतेसाठी कष्ट करत आहेत. यामुळे शिंदे गटाला वंचित आणि शिवसेनेच्या युतीचा कुठेही फटका बसणार नाही, असा दावा शहाजी बापू पाटील यांनी केला आहे.

सध्या देशाला नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची गरज आहे. ते सक्षमपणे नेतृत्व करत आहेत. पुढे भविष्यात निश्चितच पंतप्रधानपदाच्या खुर्चीला न्याय देण्याची क्षमता आणि शक्ती नितीन गडकरी यांच्यामध्येच आहे, असे शहाजी बापू पाटील यांनी विश्वास दाखवला आहे. लोकसभेत शिंदे आणि फडणवीस यांच्या उमेदवारांना चांगले बहुमत मिळेल, असा विश्वास शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube