राज्यात पुन्हा राजकीय भूकंप ! सहा खासदार ठाकरेंची साथ सोडणार, दोन खासदार दिल्लीत
ShivSena- उद्धव ठाकरे गटातील नऊ लोकसभा खासदारांपैकी सात खासदार बंड करणार आहेत. ते शिंदेसेनेत जाणार आहेत.
ShivSena UBT MPs Split: राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होणार आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना (ShivSena) फुटणार आहे. उद्धव ठाकरे गटातील नऊ लोकसभा खासदारांपैकी सात खासदार बंड करणार आहेत. ते लवकरच स्वतंत्र गट स्थापन करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीन होणार आहेत. त्यातील दोन खासदार दिल्लीत पोहोचले आहेत. उर्वरित चार खासदारही दिल्लीकडे रवाना झाले आहेत. हे सर्व खासदार स्वतंत्र गटाची स्थापना करून नंतर शिंदे गटात प्रवेश करणार आहे. आज तक हिंदीने हे वृत्त दिले आहे. त्यामुळे पुन्हा राजकीय खळबळ उडाली आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही दिल्लीला रवाना झाले आहेत. सहाही खासदार उद्या सकाळी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेणार आहेत.
भाऊसाहेब वाकचौरे, संजय देशमुख दिल्लीत
शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि यवतमाळचे खासदार संजय देशमुख दिल्लीत दाखल झाले आहेत. त्याचबरोबर इतर पाच खासदार मंगळवारी रात्री दिलेली रवाना झाले आहेत. पक्षातील फूट रोखण्यासाठी ठाकरेसेनेकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. ठाकरेसेनेचे खासदार अनिल देसाई आणि संजय राऊत हे देखील दिल्लीत दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेचा 60वा स्थापनादिन 19 जून रोजी आहे. त्यापूर्वी उद्धव ठाकरे यांना हा मोठा राजकीय धक्का बसू शकतो. सध्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे सात लोकसभा खासदार आहेत. केंद्रातील भाजपप्रणीत एनडीए सरकारमध्ये शिवसेना तिसरा सर्वात मोठा पक्ष आहे.
‘Made In India: A Titan Story’ Review : घड्याळाच्या काट्यांपलीकडची स्वप्नांची आणि जिद्दीची प्रेरणादायी कहाणी
उद्धव ठाकरे यांनी मातोश्री येथे सर्व नऊ खासदारांची बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित राहिलेले खासदार केवळ चारच होते. त्यामध्ये अरविंद सावंत, अनिल देसाई, राजाभाऊ वाजे आणि संजय दिना पाटील यांचा समावेश होता. ओमराजे निंबाळकर अनुपस्थित होते, तर संजय देशमुख आणि नागेश पाटील यांनी ऑनलाइन माध्यमातून बैठकीत सहभागी झाले होते.
कोणते खासदार सोडणार ठाकरेंची साथ?
आजतकच्या रिपोर्टनुसार, जे खासदार बंडखोरी करून बाहेर पडणार आहेत, त्यात संजय जाधव, संजय पाटील, नागेश बापूराव आष्टीकर, ओमप्रकाश राजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय देशमुख यांचा समावेश आहे.