मानोरा बाजार समिती निडवणुकांत ‘मविआ’ विजयी, खासदार भावना गवळींना धक्का, वाशिममध्ये एका जागेवर विजय

मानोरा बाजार समिती निडवणुकांत ‘मविआ’ विजयी, खासदार भावना गवळींना धक्का, वाशिममध्ये एका जागेवर विजय

Shock to Bhavana Gawli, wins only one seat in Washim Bazar Samiti elections : गेल्या दोन महिन्यांपासून चर्चेत असणाऱ्या बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी(Election of Market Committees) शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आता बाजार समित्यांचे निकाल समोर येऊ लागले. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीचा (Washim Agricultural Produce Market Committee) निकाल आता समोर आला आहे. वाशिम जिल्ह्यातील मानोरा आणि वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत खासदार भावना गवळी (MP Bhavna Gawli) यांना धक्का बसला आहे. वाशिम बाजार समितीत त्यांचा केवळ एक सदस्य निवडणून येऊ शकला आहे. मानोरा बाजार समितीत त्यांचे एक पॅनल होतं. त्यामध्येही त्यांच्या पॅनलचा धुव्वा उडाला आहे.

वाशिम बाजर समितीत खा. भावना गवळी यांच्या गटाला केवळ एक जागा मिळाली होती. ती कॉंग्रेसच्या मदतीने राखण्यात त्यांना यश आलं. वाशिम बाजार समितीत भावना गवळी यांनी लक्ष दिलं नव्हतं. मात्र, मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीत भावना गवळी यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पॅनल उभे करण्यात आले होते. मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भावना गवळी यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र, तिथे महाविकास आघाडीने राष्ट्रवादीचे माजी मंत्री सुभाष ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कडवी झुंज देत दणदणीत विजय मिळवला. महाविकास आघाडीने सुभाष ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली घवघवीत यश मिळवून 14 जागा पटकावल्या. तर भावना गवळी यांच्या पॅनलचा तिथे सुडपा साफ झाला.

CSK vs PBKS : शेवटच्या बॉलवर चेन्नईचा पराभव, एमएस धोनी निराश

वाशिम जिल्ह्यातील सर्वांत मोठी बाजार समिती म्हणून ओळख असलेल्या वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. खरंतर ही निवडणूक महाविकास आघाडी विरुध्द महाविकास आघाडी अशीच झाली. कारण, भाजप व शिवसेना (शिंदे) यांचे उमेदवार नाममात्रच होते. वाशिम बाजार समिती निवडणुकीत कॉंग्रेसचे नेते व जि प उपाध्यक्ष चक्रधर गोटे, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधीर कव्हर यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस, शिवसेना (दोन्ही), वंचित आणि भाजप यांचं शेतकरी विकास पॅनल विरुध्द शिवसेना ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस यांचं शेतकरी सहकार पॅनल अशी लढत जाली. यात शेतकरी विकास पॅनलला 15 पैकी 9 जागांवर समाधान विजय मिळाला. शेतकरी सहकार पॅनलला 6 जागांवर समाधान मानावे लागले. हमाल, व्यापारी, अडते मतदार संघात स्वतंत्र 3 उमेदवार निवडून आले. सभापती पदाच्या निवडणुकीत या तिघांचे मते निर्णायक ठरणार आहेत.

निवडणूक निकाल
शेतकरी विकास पॅनल
कॉंग्रेस – 05
वंचित – 02
शिवसेना शिंदे -01

शेतकरी सरकार पॅनल
राष्ट्रवादी – 03
शिवसेना ठाकरे गट – 03
इतर – 03

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube