फडणवीस अभ्यासू पण दिल्लीतील प्रेशर आल्यामुळे ते… महिला आरक्षणावरील फडणवीसांच्या टीकेला सुळेंचे प्रत्युत्तर

Supriya Sule on Devendra Fadanvis फडणवीसांनी विरोधकांवर महिला आरक्षणावरून टीका केली. त्यावर सुळे यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

Supriya Sule On Devendra Fadanvis

Supriya Sule on Devendra Fadanvis for Women Reservation Bill : संसदेत महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून मोठा राजकीय सानी घटनात्मक वाद निर्माण झाला असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तीव्र आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या कार्यकाळात प्रथमच संविधान (131 वि दुरुस्ती) विधेयक 2026 हे लोकसभेत मंजुरी न मिळालेलं ठरलं. ज्यामुळे या विषयाचं राजकारण अधिक तापलं आहे. यामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील विरोधकांवर महिला आरक्षणावरून टीका केली. यामध्ये आता सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

फडणवीस हे सुशिक्षित, हुशार आहेत तसेच ते वाचनही करतात. त्यामुळे त्यांच्या ही आपेक्षा नव्हती. तसेच विरोधी पक्षाला महिला विरोधी म्हणून काहीही होणार नाही. एनडीए आघाडीतील सर्व पक्षांना एकच ब्रिफिंग दिले जाते. त्यासाठी त्यांना एक नोट पाठवली जाते. ते ती स्वत: च्या मित्रपक्षांना पाठवतात. मग सगळे त्या मुद्द्यावर एका सुरात बोलतात. पण महिला आरक्षण विधेयक 2023 लाच मंजूर झाले आहे. त्यात फडणवीस हे आभ्यासू नेते आहेत. त्यांना देखील हे माहिती आहे. पण त्यांना दिल्लीवरून तशी नोट किंवा प्रेशर आलं असेल त्यामुळे अशी भूमिका घेत आहेत.असं म्हणत फडणवीसांच्या टीकेला सुळेंनी उतत्र दिलं आहे.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार त्यांनी संविधान सभेमध्ये व्यक्त केले आहे त्याला अनुरूप असलेला कायदा आल्यानंतर तो कायदा पाडायचा आणि संविधान जिंकला म्हणायचं, खरं म्हणजे संविधानकरांच्या विचारांवरील एक प्रकारे काँग्रेसने घाला घातलेला आहे. महिलांना तर निश्चितपणे मागे टाकण्याचे काम त्यांनी केलंय, त्यामुळे मी राहुल गांधींनी माफी मागावी असं कधी म्हणणार नाही. कारण ते मागणारच नाही मला माहिती आहे. त्यांना महिलांचा अपमान करणं समाजातल्या इतर घटकांचा अपमान करण हा छंद आहे. खरं म्हणजे त्यांनी तर, साष्टांग दंडवत घालून महिलांची माफी मागितली पाहिजे पण ते तसं करणार नाही कारण त्यांचा तो स्वभाव असल्याचे फडणवीस म्हणाले.

follow us