तटकरे-भास्कर जाधवांत विस्तव जात नव्हता…पण आता मतदारसंघ सोडण्याची चर्चा

  • Written By: Published:
तटकरे-भास्कर जाधवांत विस्तव जात नव्हता…पण आता मतदारसंघ सोडण्याची चर्चा

मुंबईः प्रफुल्ल साळुंखे,विशेष प्रतिनिधी

रायगड लोकसभा निवडणुकीसाठी आपली तयारी असल्याचे संकेत ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी दिल्याने कोकणातला राजकीय समीकरण बदलत आहे का ? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्या अभिनंदन अभिवादन या पुस्तकाचं प्रकाशन आज मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे पार पडलं.

याच राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, सुनील तटकरे आणि भास्कर जाधव यांच्यात स्थानिक राजकारणावरून चांगलीच जुगलबंदी रंगली होती. सुनील तटकरे खासदार आहेत. या दरम्यान राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले; पण तटकरे यांना मंत्री होता आले नाही. तटकरे यांची इच्छा नक्कीच झाली असेल असा उल्लेख अजित पवार यांनी केला. लोकसभेसाठी मुलाला पाठवता आले नसते म्हणून सुनील तटकरे यांना जावं लागलं, असंही अजित पवार बोलून गेले.

तटकरे यांचे एकेकाळी विरोधक भास्कर जाधव यांनीही हा धागा पकडत टोलेबाजी केली. जर तटकरे यांना खाली यायचं असेल तर मी दिल्लीला जायला तयार आहे, तसंही आमचं आता जमायला लागलं, असं जाधव यांनी सांगत सभागृहात हशा पिकवला.

शेवटी सुनील तटकरे यांनी या सर्वांवर कोटी करत राजकीय चर्चेचं वर्तुळ पूर्ण केलं. ‘दादा जर भास्कर जाधव गुहागर मतदारसंघ माझ्यासाठी सोडणार असतील तर मी यायला तयार आहे’ असा टोला तटकरे यांनी लगावला आहे.

एकेकाळी दोन्ही नेत्यात विस्तव जात नव्हता , अशा परिस्थितीत जाधव-तटकरे एकत्र आल्याने महा आघाडी भक्कम झाली आहे. हे दोन्ही नेते एक राहिले तर लोकसभासाठी नक्कीच पडसाद उमटतील हे नक्की.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube