विधानसभेत सरडे बसलेत, ठाकरे गटाच्या खासदाराकडून नार्वेकरांवर हल्लाबोल

विधानसभेत सरडे बसलेत, ठाकरे गटाच्या खासदाराकडून नार्वेकरांवर हल्लाबोल

Thackeray Group vs Shinde Group : विधानसभेत सरडे बसले आहेत. अनके पक्ष त्यांनी बदलले आहेत. त्यामुळे अनके पक्षांचे रंग त्यांच्या अंगावर आहेत. विधानसभा अध्यक्ष असल्याने हवा तसा विलंब करत आहेत, असा हल्लाबोल खासदार अरविंद सावंत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर केला आहे.

सर्वोच्च न्यायालायने दिलेल्या निर्णयानंतरही बेकायदेशीर सरकार बसलं आहे. देशात लोकशाही आणि संविधानचा कोण सन्मान राखतो की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे, अशी टीका अरविंद सावंत यांनी केली.

गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील वादाची सुनावणी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण 54 आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी तीन आठवडे लांबणीवर गेली आहे. शिंदे गटातील आमदारांनी कागदपत्रांची मागणी करत दोन आठवड्यांचा कालवधी मागितला होता. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांना आणखी एक आठवड्यांचा वेळ दिला. त्यानंतर प्रतिज्ञापत्र व त्यास उत्तर देण्यासाठी 10 दिवसांचा कालावधीही मंजूर करण्यात आला आहे.

बाळासाहेब असते तर त्यांनी शिंदेंसाठी हातात ऊसाचा बुडका घेतला असता; ऊस निर्यातबंदीवरून राजू शेट्टी संतापले

ते पुढं म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. अंमलबजावणी विधनासबा अध्यक्षांनी करायची आहे. पण विधानसभेत सरडे बसले आहे. अनेक पक्ष त्यांनी बदलले आहेत. अनेक पक्षांचे रंग त्यांचा अंगावर आहेत. विधानसभा अध्यक्ष असल्याने हवा तसा विलंब करत आहेत.

Sharad Pawar : पिंपरी-चिंचवडमध्ये शरद पवारांना मिळाला नवा शिलेदार

निवडणूक आयोगाने शिवसेना चिन्ह आणि नाव काढून घेतले, ते बेकायदेशीर आहे. निवडणूक आयोगानं आमच्याकडून 20 लाख फार्म घेतले. समोरच्यांनी किती फॉर्म भरुन दिले? याचा आकडाही जगाला कळूद्या. मग पक्ष, नाव, आणि चिन्ह त्यांना कसं दिलं? चाळीस आमदार म्हणचे पक्ष नाही. एखाद्या पक्षात एकच आमदार आहे. तो आमदार पक्षातून बाहेर गेल्यावर काय होईल? असा सवाल अरविंद सावंत यांनी उपस्थि केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube