सीबीआय सोमय्यांसारख्या लोकांच्या निर्देशाखालीच चालतं; पृथ्वीराज चव्हाणांचा थेट आरोप
सातारा : महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi)सातत्यानं केंद्रीय तपास यंत्रणा (Central Investigation Agency) केंद्र सरकारच्या (Central Govt)दबावाखाली काम करत असल्याची टीका केली जातेय. त्यातच आता राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavhan)यांनी सीबीआय (CBI) भाजप (BJP)नेते किरीट सोमय्यांसारख्या (Kirit Somaiya) लोकांच्या निर्देशाखाली चालत असल्याचा आरोप केलाय. त्याचवेळी आगामी काळातील निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचंही चव्हाण यांनी सांगिलंय.
यावेळी चव्हाण म्हणाले की, सीबीआय ही पूर्णपणे स्वतंत्र, स्वायत्त संस्था आहे. त्यामध्ये हस्तक्षेप करायचा आणि निर्देश द्यायचा प्रश्नच येत नाही. सीबीआय कोणावर छापा टाकणार आहे? कोणाची चौकशी करणार आहे? याची माहिती सरकारला देण्याचा देखील प्रश्न उद्भवत नाही. आमच्या काळात आम्ही त्यांना कधी विचारत नव्हतो आणि ते आम्हाला कधी सांगत नव्हते.
ठाण्यात शिवसेना शाखेचा वाद पेटला, दोन्ही गटाचे कार्यक्रर्ते आमने सामने
आज मात्र किरीट सोमय्यांना त्यांच्या सर्व बातम्या मिळतात. आता कोणावर ताण पडणार आहे? कोणावर धाड टाकायची आहे? याची सर्व माहिती सोमय्यांना मिळते. त्यामुळं अशा लोकांच्याच निर्देशाखालीच सीबीआय चालते की काय अशी शंका येत असल्याचं कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय.
आत्ताच पुण्याच्या कसबा पोटनिवडणुकीचा निकाल लागला. जो मतदारसंघ तब्बल 32 वर्ष भाजपच्या ताब्यात होता तो भाजपला गमवावा लागला. म्हणजे जातीवादी पक्षांना रोखण्याचा महाविकास आघाडीचा चाललेला प्रयोग यशस्वी होत असल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर यापुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील किंवा महापालिकेच्या निवडणुका असतील त्यामध्ये हा प्रयोग आम्ही यशस्वीपणे राबवण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही यावेळी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलंय.
महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून सातत्यानं केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआय, एनआयए, इडीचा केंद्र सरकारकडून दुरुपयोग केला जात असल्याचा आरोप केला जातोय. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अटकेवरुनही उद्धव ठाकरे यांनी देखील याबद्दल आरोप केले होते. त्यावेळी ठाकरेंनी इडीसारख्या स्वायत्त संस्था पाळीव प्राण्यासारख्या वागत असून सरकार त्यांना ज्यांच्या अंगावर जा म्हणतं त्यांच्या अंगावर जातं, अशी जोरदार टीका केली होती.