Nashik Graduate Constituency Election : निकालाआधीच झळकले तांबेंच्या विजयाचे पोस्टर्स

Nashik Graduate Constituency Election : निकालाआधीच झळकले तांबेंच्या विजयाचे पोस्टर्स

अहमदनगर : आज नाशिक पदवीधर निवडणुकीच्या मतमोजणीला (Nashik Graduate Constituency Election)सुरुवात झाली आहे. सकाळी 8 वाजता मतमोजणीला ()सुरुवात झालीय. पण त्याआधीच अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्या विजयाचे पोस्टर्स झळकल्याचे पाहायला मिळत आहेत. या पोस्टर्सची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्याची पाहायला मिळतेय.

या पोस्टर्समध्ये ‘जीत’ सत्याची विजय नव्या पर्वाचा! अशा आशयाचे पोस्टर्स संगमनेरमध्ये लागले आहेत. नाशिक पदवीधर मतदारसंघात भरघोस मतांनी विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन, असे पोस्टर्स नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी लावल्याचं पाहायला मिळतंय. त्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.

नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत सत्यजित तांबे जिंकणार की शुभांगी पाटील बाजी मारणार याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच आता अशा प्रकारचे पोस्टर्स लागल्यानं विविध चर्चांना उधाण आलंय.

नाशिक पदवीधरची जागा ही महाविकास आघाडीसह भाजपसाठी देखील प्रतिष्ठेची बनलेली पाहायला मिळतेय. सत्यजित तांबे यांना अहमदनगरमधील भाजपनं पातळीवर कार्यकर्त्यांना मतदानाचं आवाहन केलं होतं. त्यामुळं या जागेचा निकाल सत्यजित तांबेंच्या पुढची राजकीय वाटचाल ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube