राजकीय वनवास संपला! ‘श्रद्धा अन् सबुरी’ चं फळ मिळालेल्या तावडेंची संपत्ती दशकात पाचपट
Vinod Tawade भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंनी राज्यसभा निवडणुकीसाठी सादर कलेले प्रतिज्ञा पत्रानुसार त्यांची एकूण मालमत्ता समोर आली आहे.
Vinod Tawade Got Rajyasabha Candidacy by BJP Their assets increased by five times in a period of ten years : राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर केली. यात विनोद तावडे, यांना संधी देण्यात आली आणि गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय वनवासात असलेल्या तावडेंचा वनवास अखेर संपल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर आता बरोबर महाराष्ट्र राजकारणातील कळीचा मुद्दा ठरलेल्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, उमेदवारांच्या मालमत्तेची आकडेवारी आता समोर आली आहे. त्यामध्ये राजकीय वनवास जरी असला तरी तावडेंच्या संपत्तीतील वाढ ही आश्चर्यकारक आहे. ही संपत्ती नेमकी कुठू आली. तावडेंचं प्रतिज्ञापत्रात नेमकं काय म्हटलंय जाणून घेऊ सविस्तर…
Middle East War : भारतीय बंदरांवर मोठी कोंडी; 4 लाख टन बासमती अन् 5 हजार टन कांदा अडकला
सुरूवातीला पाहूयात तावडेंनी गेल्या काही वर्षांत म्हणजे सरकारमधील पदांवर नसताना पक्षात निर्माण केलेल्या त्यांच्या अढळ स्थानाबद्दल.2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये विनोद तावडे यांचं तिकीट कापलं होतं. मात्र त्यानंतर भाजपने त्यांना राष्ट्रीय सचिव आणि काही दिवसांतच राष्ट्रीय महासचिव म्हणून जबाबदारी देत त्यांचे संघटनेमध्ये राष्ट्रीय पातळीवर पुनर्वसन केलं. याशिवाय चंदीगड आणि बिहारचे प्रभारीपद त्यांच्याकडे देण्यात आलं.
Iran Israel War : इराण आणि इस्रायलमधील युद्ध 12 मार्च रोजी संपणार?; डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
या संधीचं सोनं त्यांनी कसं केलं बिहार विधानसभेमध्ये तावडेंची रणनितीने भाजपला कसं बंपर बहुमत मिळवून दिलं. त्या अगोदर तावडे महाराष्ट्र विधानसभेच्यावेळी जरा नकारात्मक पद्धतीने चर्चेत आले. मात्र त्याआधी लोकसभेला देखील त्यांनी झिरो टू हिरो अशी झेप घेतली. कारण तावडेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपच्या तब्बल 115 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्या अगोदर तावडेंनी फेब्रुवारी 2024 मध्ये बिहार प्रमाणेच चंदीगड महापालिकेतही त्यांनी सत्ता आणली पण नंतर तेथे भाजपला बॅक फूटवर यावं लागलं. मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये यश मिळवल्यानंतर बाजूला सारत नवे चेहरे मुख्यमंत्रिपदावर आणले. राजस्थानात वसुंधरा राजे या प्रस्थापित आणि राज घराण्यातील नेत्याला सांभाळून त्यांची समजूत काढून त्यांना शांत करण्यात आपले राजकीय कसब पणाला लावले.
Mardaani 3 ची 5व्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर मजबूत पकड; एकूण कमाई 51.47 कोटी
त्यामुळे 2019 च्या निवडणुकीत तिकीट कापल्यानंतर ज्या तावडेंचे राजकारण संपले संपले असे वाटत होते. मात्र त्या तावडेंनी राष्ट्रीय स्तरावर मिळालेल्या संधीचं सोन करत मागच्या तीन ते चार वर्षांमध्ये भाजपला हिमाचल प्रदेशपासून राजस्थान, हरयाणा, उत्तराखंड, बिहार आणि चंदीगड अशा बऱ्याच अवघड मोहिमा फत्ते करुन दिल्या अन् ज्याप्रमाणे वाजपेयी, अडवाणींसोबत प्रमोद महाजनांचं नाव होतं तसं आता मोदी शहांनंतर तावडे हे नाव जोडंलं आहे.मात्र आता तावडेंना मिळालेली केरळची मोहीम तशी जोखमीची आहे कारण तावडेंकडे जरी निवडणुका जिंकण्याची हातोटी असली तरी केरळ हा भाजपसाठी कधीही न सुटलेला प्रश्न आहे.
आता पाहूयात याच भाजपच्या मास्टर स्ट्रोक देणाऱ्या नेत्याची संपत्ती नेमकी कीती?
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस असलेल्या विनोद तावडे यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी सादर कलेले प्रतिज्ञा पत्रानुसार त्यांची एकूण मालमत्ता 31.8 कोटी रुपये एवढी आहे. या आकड्याची तुलना 2014 च्या त्यांच्या विधानसभा निवडणुकी वेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञा पात्राशी केल्यास त्यामध्ये एक मोठा फरक दिसतो. कारण 2014 मध्ये जेव्हा त्यांनी मुंबईतील बोरिवली मतदारसंघातून निवडणूक लढवून विजय संपादन केला होता. तेव्हा त्यांची एकूण संपत्ती 6.8 कोटी रुपये इतकी होती. म्हणजेच गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत त्यांच्या मालमत्तेत सुमारे पाच पटीने वाढ झाली आहे. ही संपत्ती आता 31 कोटींच्या पुढे गेली आहे. त्यांच्या या आर्थिक सुबत्तेत स्थावर मालमत्ता विविध गुंतवणुकीचा मोठा असल्याचे दिसून येतं आहे.
जुन्या मैत्री आणि नव्या सत्तेमधील संघर्ष उलगडणार ‘एस्पिरेंट्स’ सीझन 3 चा दमदार ट्रेलर रिलीज
यामध्ये राज्यसभा निवडणुकीसाठी सादर कलेले प्रतिज्ञा पत्रानुसार विनोद तावडे आणि त्यांच्या पत्नी 2020-2021 या अर्थिक वर्षापासून ते 2024-2025 या अर्थिक वर्षापर्यंतचं उत्पन्न दाखवण्यात आलं आहे.
2020-2021 – 81 लाख 1 हजार 790
2021-2022 – 89 लाख 44 हजार 020
2022-2023 – 1 कोटी 12 लाख 36 हजार 530
2023-2024 – 2 कोटी 30 लाख 91हजार 380
2024-2025 – 1 कोटी 30 लाख 46 हजार180
विनोद तावडे यांचे प्रतिज्ञापत्र वाचण्यासाठी यथ क्लिक करा…
