निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? दीपक केसरकरांनी थेट सांगून टाकलं…

निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? दीपक केसरकरांनी थेट सांगून टाकलं…

Deepak Kesarkar News : आगामी निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार? याबद्दल शिंदे सरकारचे मंत्री दीपक केसरकरांनी (Deepak Kesarkar) माध्यमांना सांगितलंय. सध्या तरी ठरल्यानूसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणुका लढवणार आहेत. त्यानंतर काही काळ भाजपचा तर काही काळ शिवसेनेचा मुख्यमंत्री असू शकतो, हा निर्णय फडणवीस शिंदेसह वरिष्ठ नेते घेणार असल्याचं दीपक केसरकरांनी स्पष्ट केलं आहे. (who is the face of the chief minister after the elections deepak kesarkar said)

Devendra Fadanvis : कोयता हल्ल्यात तरूणीला वाचवणाऱ्यांचे फडणवीसांकडून कौतुक; जवळगे म्हणाला, ‘तुम्ही आमच्याशी…’

सत्तासंघर्षानंतर राज्यात शिवसेना-भाजप युतीचं सरकार स्थापन झालं असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवी उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे आगामी काळातही हीच परिस्थिती राहणार का? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे. त्यावरुन आता दीपक केसरकरांनी थेट भाष्य करीत सांगितलं आहे.

Pune Crime : तरुणीवर कोयता हल्ल्यानंतर पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई; 3 पोलीस निलंबित

दीपक केसरकर पुढे बोलताना म्हणाले, आगामी काळात शिवसेना-भाजप युतीचा मुख्यमंत्री कोण असेल? याबाबत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांसह वरिष्ठ नेते निर्णय घेतील पण सध्या तरी फडणवीसांच्या म्हणण्यानूसार आम्ही एकनाथ शिंदेंच्याच नेतृत्वाखाली निवडणुकांना शिवसेना-भाजप युती सामोरं जाणार असल्याचं केसरकरांनी स्पष्ट केलं आहे.

गोळीबारानंतर भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले हल्लेखोर…

आगामी विधानसभा निवडणुकीनंतर काही काळ भाजपचा तर काही काळ शिवसेनेचा मुख्यमंत्री असू शकतो, असंही भाकीत दीपक केसरकरांनी केलं आहे. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात एकच चर्चा रंगली आहे.

यावेळी बोलताना केसरकरांनी इतर राजकीय घडामोडींवरही भाष्य केलं असून शरद पवारांच्या उठावावरही भाष्य केलंय. ते म्हणाले, शरद पवारांनी केलेला तो उठाव अन् आम्ही केलेली गद्दारी कशी? असा सवाल उपस्थित करीत त्यांनी पवारांवर निशाणा साधला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube