समाजासाठी झटणाऱ्या घटकांसाठी पुढाकार, जाधवर इन्स्टिट्यूटस तर्फे शैक्षणिक शुल्कात 25 टक्के सवलत
संस्थेत केजी ते पीजी च्या अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या आणि शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ही सवलत देण्यात येणार आहे.
25% concession on tuition fees by Jadhavar Institutes : समाजासाठी विविध माध्यमातून झटणारे पोलीस, सैनिक, पत्रकार, अग्निशमन दल, रुग्णवाहिका चालक यांच्या पाल्यांसाठी नऱ्हे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस तर्फे शैक्षणिक शुल्कात 25 टक्के सवलत देण्याचे नुकतेच जाहीर करण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ही घोषणा करण्यात आली आहे. संस्थेत केजी ते पीजी च्या अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या आणि शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ही सवलत देण्यात येणार आहे.
ब्रिगेडियरचा गणवेश, बनावट ओळखपत्र आणि खोटी सुरक्षा व्यवस्था; तरुणाचा धक्कादायक बनाव उघड
संस्थेचे उपाध्यक्ष ऍड. शार्दूल जाधवर म्हणाले, पोलीस, सैनिक, पत्रकार, अग्निशमन दल, रुग्णवाहिका चालक यांच्या पाल्यांसाठी ही सवलत देण्यात येत आहे. समाजाचे आपण देणे लागतो, यामाध्यमातून हे घटक सातत्याने काम करतात. त्यामुळे त्यांच्याकरिता ही सवलत दिली जात आहे.
तसेच विज्ञान आणि संशोधन क्षेत्रात पुढे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संस्थेमार्फत संशोधनासाठी १० लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते. तसेच खेळाडू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जाधवर फेस्टिव्हलसारखे उपक्रम राबवले जातात. जिल्हा स्तरापुढे प्रगती करणाऱ्या खेळाडूंचा आवश्यक खर्च संस्था उचलते, असेही त्यांनी सांगितले.