Pune Bypoll election : कसब्यात ‘या’ दोन दिवशी, ड्राय डे !

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (6)

पुणे : पुणे जिल्ह्यातील (Pune Bypoll election) चिंचवड आणि कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने मतदान संपण्याच्या ४८ तास अगोदर म्हणजेच २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ पासून मतदानाच्या दिवशी २६ फेब्रुवारीपर्यंत मतदान प्रक्रिया संपेपर्यंत आणि मतमोजणीच्या २ मार्च २०२३ रोजी मतमोजणीची प्रक्रिया संपेपर्यंत संपूर्ण मतदार संघ परिसरातील सर्व किरकोळ मद्यविक्री बदं (Dry Day) ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी (Collector) डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केले आहे.

पुणे जिल्ह्यातील चिंचवड आणि कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीकरिता २६ फेब्रुवारी २०२३ रोजी मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. ही निवडणूक खुल्या, मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पडावी, याकरिता जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी निर्देशित कालावधीत आणि मतदार संघात सर्व किरकोळ मद्यविक्रीवर बंदी घालण्यात आली.

या कालावधीत निवडणूक परिसरातील सर्व देशी, विदेशी, बिअर, वाईन हे बंदच्या कालावधीत उत्पादन करु शकतील. परंतु या कालावधीत ‘ड्राय डे’ लागू असलेल्या परिसरातील या विक्रेत्यांना देशी, विदेशी मद्याचा पुरवठा करता येणार नाही. या बंद कालावधीमध्ये मद्यविक्री करत असल्याचे आढळून आल्यास संबंधितांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात येणार आहे, आणि तसेच संबंधितांवर फौजदारी कारवाई केली जाणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आलं आहे.

Tags

follow us