अजित पवारांचे धाकटे चिरंजीव अडकणार लग्नबंधनात; जय पवार होणार फलटणचे जावई

अजित पवारांचे धाकटे चिरंजीव अडकणार लग्नबंधनात; जय पवार होणार फलटणचे जावई

Ajit Pawar Son Jai Pawar Marriage is Confirmed : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे (Jai Pawar) चिरंजीव जय पवार हे लवकरच लग्नबंधनामध्ये अडकणार आहेत. फलटणचे प्रवीण पाटील यांच्या कन्या ऋतुजा पाटील यांच्याशी त्यांचा विवाह होणार आहे. येत्या १० एप्रिल रोजी दोघांचा साखरपुडा होणार असून शरद पवारांना या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियामध्ये एक पोस्ट केली आहे. जय आणि ऋतुजा यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. जय पवार यांनी होणाऱ्या पत्नी  ऋतुजा पाटीलसह शरद पवारांची भेट घेतली. यावेळी पवार कुटुंबियांनी नवीन जोड्याचं औक्षण करुन शुभेच्छा दिल्या. ते फोटो सुप्रिया सुळे यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

महायुतीमध्ये इनकमिंग सुरूच! आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या गळाला लागले कॉंग्रेसचे दोन बडे नेते?

जय पवार ऋतुजा यांच्यासोबत करणार विवाह

खासदार आणि जय पवार यांच्या आत्या सुप्रिया सुळे यांनी जय पवार यांनी केलेल्या एका पोस्टमुळे या लग्नाची गोड बातमी समोर आली आहे. सुप्रिया सुळे यांनी जय पवार आणि ऋतुजा यांचे फोटो शेअर केले आहेत.

जय पवार यांनी होणारी पत्नी ऋतुजा यांच्यासोबत आजोबा-आजी म्हणजेच शरद पवार आणि प्रतिभा पवार यांचे आशीर्वाद घेतले. या भेटीचे फोटो पोस्ट करत सुप्रिया सुळे यांनी जय पवार यांचे अभिनंदन केले आहे. जय पवार यांचा लवकरच साखरपुडा होणार असल्याचे समजते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या