Amit Shah यांनी घेतली गिरीश बापट यांची भेट

Amit Shah यांनी घेतली गिरीश बापट यांची भेट

पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)दोन दिवसांच्या पुणे (Pune)दौऱ्यावर आहेत. कसबा (Kasba)आणि चिंचवड (Chinchwad)पोटनिवणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहांचा पुणे दौरा महत्वाचा मानला जातोय. या दरम्यान अमित शाहांनी भाजप खासदार गिरीश बापट (Girish Bapat)यांची भेट घेतली. बापट गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. पुणे दौऱ्यावर आल्यानंतर अमित शाहांनी त्यांची भेट घेत तब्येतीची विचारपूस केलीय, ते म्हणाले आपण लवकर बरे व्हा, आपल्या आरोग्याची काळजी घ्या असेही बापट यांना म्हणाले. यावेळी अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis), पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil), भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule)यांच्यासह भाजप नेते उपस्थित होते.

घोले रोड येथील महात्मा फुले वस्तू संग्रहालय येथे जाऊन अमित शाहांनी बापटांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी शाहा म्हणाले, आपण लवकर बरे व्हा, आपल्या आरोग्याची काळजी घ्या असेही ते बापट यांना म्हणाले. काही दिवसांपासून खासदार गिरीश बापट यांची प्रकृती खालावल्यानं भाजपचे वरिष्ठ नेते तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात येऊन बापट यांची भेट घेतली.

Turkiye Earthquake: तुर्कीमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 5.2 तीव्रता

दोन दिवसांपूर्वी प्रकृती ठीक नसतानाही बापट कसबा पोटनिवडणुकीत भाजपाकडून हेमंत रासनेंच्या प्रचारासाठी आले होते. पण नाकात ऑक्सिजनची नळी असताना गिरीश बापट यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यांच्या हातालाही ऑक्सिमीटर लावला होता. अशा अवस्थेतही ते भाजपाच्या प्रचारासाठी आले होते. श्वास घ्यायला त्रास होत असल्याचं कॅमेरात स्पष्ट दिसून आलं होतं.

अनेक दिवसांपासून बापट एका मोठ्या आजाराशी लढा देत आहेत. आजारी असतानाही भाजपानं बापटांना प्रचारासाठी यावं लागलं. त्यावरुनही विरोधी पक्षाकडून भाजपावर जोरदार टीका करण्यात आली. मुक्ता टिळक यांच्याआधी कसबा विधानसभा मतदार संघाचं आमदार म्हणून गिरीश बापट यांनी साधारण 30 वर्षे नेतृत्व केलंय. तसेच बापट हे पुणे शहराचे विद्यमान खासदार आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube