अजित पवारांचे हिंदीतून भाषण पण सिध्दरामय्या कानडीतून बोलले !
Karnataka Cm Siddaramaiah Mahrashtra Tour : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या हे रविवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. सांगली येथील काँग्रेसच्या मेळाव्याला ते उपस्थित होते. त्यानंतर ते बारामती येथील अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. यात सिध्दरामय्या यांच्या भाषणांची मात्र आता चर्चा सुरू झाली होती. सिध्दरामय्या (Siddaramaiah) हे हिंदीतून किंवा इंग्रजीतून बोलले नाहीत. ते थेट आपल्या मातृभाषेतून कानडीतून (kannadi)बोलते होते. मात्र दोन्ही ठिकाणी जमलेली गर्दी मराठी होती. त्यांना कानडी भाषा समजत नव्हती. त्यावर उपाय म्हणून दोन्ही ठिकाणी मुख्यमंत्र्यांचे भाषण मराठीत सांगण्यासाठी दुभाषी नेमण्यात आले होते.
(karnataka-cm-siddaramaiah-mahrashtra-tour-speech-in-kannada-langauage)
‘कर्नाटक मॉडेल महाराष्ट्रात लागू करा’, सिद्धरामय्यांनी दिला शरद पवारांना प्लॅन
सांगली येथे काँग्रेस पक्षाचा मेळावा होता. या निर्धार मेळाव्यात काँग्रेसचे राज्यातील नेते उपस्थित होते. तेथील स्थानिक नेते विशाल पाटील यांनी मराठीतून भाषण केले. त्यानंतर आमदार विश्वजित कदम यांनीही आपले मराठीतून भाषण दिले. जतमधील पाणी प्रश्नाची माहिती मुख्यमंत्र्यांना होण्यासाठी विश्वजित कदम यांनी आपल्या भाषणात काही ठिकाणी इंग्रजी वापरली. त्यानंतर काही नेत्यांची भाषण झाल्यानंतर मुख्यमंत्री सिध्दरामय्या हे आपले भाषण देण्यासाठी आले. त्यांनी उपस्थितांना कानडीतून बोलतो असे विचारले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचे भाषण मराठीतून सांगण्यासाठी दुभाषी नेमण्यात आले. सिद्धरामय्या यांनी तब्बल पाऊण तास भाषण ठोकले. त्यानंतर सिध्दरामय्या हे बारामती येथील कार्यक्रमासाठी आले.
जिल्हाधिकाऱ्यांचा एक फोन अन् वारकऱ्याचे वाचले ‘प्राण’
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात आयोजित करण्यात आला होता. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धनगर समाज उपस्थित होता. खासदार सुप्रिया सुळे यांनी धनगर समाजाचे आरक्षणाचा प्रश्न मांडला. त्यावेळी सुप्रिया सुळे काही वेळ मराठीतून बोलल्या तर काही बाबी त्यांनी इंग्रजीतून सांगितल्या. त्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. तर मुख्यमंत्री सिध्दरामय्यांचे यांचे स्वागत करताना तब्बल पाच मिनिटे अजित पवार हे हिंदीतून बोलत होते. त्यानंतर त्यांनी मराठीतून भाषण केले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठीतून भाषण केले व काही शब्द ते इंग्रजीतून बोलले होते.
त्यानंतर मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी आपले पूर्ण भाषण कानडीतून केले. तब्बल वीस मिनिटे सिध्दरामय्या यांचे भाषण झाले.या भाषणात त्यांनी होळकर यांच्या जीवनाबाबत सांगितले. तेथेही दुभाषकी नेमण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांची कानडी भाषण. त्याचे मराठीत भाषांतर यांची मात्र दोन्ही ठिकाणी जोरदार चर्चा आहे.