MES च्या अध्यक्षपदी बाबासाहेब शिंदे; आनंदी पाटील उपाध्यक्षा

  • Written By: Published:
Babsaheb shinde Mes

पुणेः महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या (Maharashtra Education Society) नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी बाबासाहेब शिंदे व उपाध्यक्षपदी आनंदी पाटील यांची आज निवड करण्यात आली आहे. तसेच संस्थेच्या सचिवपदी डॉ. अतुल कुलकर्णी यांची तर सहाय्यक सचिवपदी सुधीर भोसले यांची निवड करण्यात आली.

बाबासाहेब शिंदे हे व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते आहेत. तर आनंदी पाटील या उद्योजिका आहेत. डॉ. अतुल कुलकर्णी आणि सुधीर भोसले महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयात कार्यरत आहे. ते अनुक्रमे शिक्षण आणि इलेक्ट्रॉनिक्स हे विषय शिकवितात. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष म्हणून एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांची तर उपाध्यक्ष म्हणून प्रदीप नाईक यांची संस्थेच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत फेरनिवड करण्यात आली आहे.

संस्थेच्या नियामक मंडळावर सदस्य म्हणून देवदत्त भिशीकर, विजय भालेराव, अॅड. सागर नेवसे, डॉ. विवेक कानडे, सीए राहुल मिरासदार, राजीव हजरनीस, अजय पुरोहित यांची निवड झाली आहे. या सर्वांची २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी ही निवड झाली आहे.

Tags

follow us