Pune Rain : पुणेकरांनो सावधान! आजही कोसळधार; ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

Pune Rain : पुणेकरांनो सावधान! आजही कोसळधार; ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

Pune Rain : राज्यात काल गणेश विसर्जनाच्या (Ganpati Visarjan 2023) दिवशी पावसाने अनेक जिल्ह्यांत जोरदार हजेरी लावली. पुण्यातील (Pune Rain) सिंहगड रोड परिसरात तुफान पाऊस झाला. इतका की रस्त्यांवर कमरेइतके पाणी साचले. लोकांच्या घरात सगळीकडे पाणीच पाणी दिसत होते. अजूनही पाऊस बरसतच आहे. आजही राज्यात अनेक जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील तीन जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा (Heavy Rain) अंदाज आहे. कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच आज पुणे, मुंबई या शहरांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! नगरकरांनी जड अंतःकरणाने विशाल गणपतीला दिला निरोप

आज विदर्भातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 1 ऑक्टोबरपासून पावसाचा जोर कमी होईल असा अंदाज आहे. 2 ऑक्टोबरला संपूर्ण राज्यात ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबई, मुंबई उपनगरासह काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. येथील या परिस्थितीची परिणाम म्हणून पश्चिम बंगाल आणि ओडिशासह काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पुढील दोन दिवस अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात आणखी काही दिवस जोरदार पाऊस बरसणार आहे.

नगर पुण्यात संततधार पावसाची हजेरी

राज्यातील नगर, पुणे, नाशिक, सातारा, सांगली या जिल्ह्यांत संततधार पाऊस सुरूा आहे. नाशिक जिल्ह्यांत सुरुवातीच्या टप्प्यात पाऊस झाला. नंतर मात्र पावसाने मोठी विश्रांती घेतली. आता मागील सहा दिवसांपासून या जिल्ह्यांतही चांगला पाऊस होत असल्याने शेतकरी सुखावला आहे. खानदेशातील जळगाव जिल्ह्यातही पावसाने जोर धरला आहे. एकंदरीतच राज्यात यंदा सर्वत्र पाऊस होत आहे. या पावसाने शेती पिकांच्या पाण्याची मोठी काळजी मिटवली आहे. तसेच काही ठिकाणी दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. ती परिस्थिती निवळण्यास या पावसाने मदत होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube