लोकांच्या रोजगाराचा, विद्यार्थी हिताचाच कायदा करणार; कोचिंग क्लासेस संघटना-राज्यमंत्री पंकज भोयर यांच्यात बैठक…

महाराष्ट्र कोचिंग क्लासेस संघटना आणि राज्यमंत्री पंकज भोयर यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत कोचिंग क्लासेस संदर्भात करण्यात येणाऱ्या कायद्यावर चर्चा करण्यात आलीयं.

Pankaj Bhoyar

मुंबई : महाराष्ट्रातील ९ कोचिंग क्लासेस संघटनांची शिखर संस्था ‘स्टेट कोसॉर्टियम ऑफ कोचिंग टीचर्स अँड इन्स्टिट्यूट’ (एससीसीटीआय) चे अध्यक्ष डॉ. पी. कुलकर्णी आणि संघटनांचे प्रतिनिधी यांनी शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांचे सोबत प्रस्तावित कोचिंग क्लासेस रेग्युलेशन अँड कंट्रोल ऍक्ट २०२६ बाबत मंत्रालयात बैठक संपन्न झाली. यामध्ये शिक्षण राज्य मंत्री भोयर, सचिव राजकुंवर देवल आणि कायदा समितीचे सदस्य आणि शिखर संघटनेचे अध्यक्ष डॉ. पी. कुलकर्णी आणि शिखर संघटनेचे सदस्य असलेले महाराष्ट्रातील नऊ संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

एससीसीटीआय या शिखर संघटनेचे कुलकर्णी यांनी महाराष्ट्रातील कोचिंग क्लास संचालकांची भूमिका सविस्तर पणे मांडली. यामध्ये सर्व कोचिंग क्लासेससाठी सक्तीची नोंदणी परंतु किमान शंभर विद्यार्थ्यांवर संख्या गेल्यास कायद्यातील तरतुदी लागू करणे, १३ वर्षाख़लील विद्यार्थ्याना क्लासेसला बंदी मागे घेऊन पालकांना पाल्याबाबतीतला तो अधिकार देणे, अग्निशमन व्यवस्था नियमन अधिक सोयीचे करणे, प्रत्येक विद्यार्थ्याला एक स्क्वेयर मीटर जागा ऐवजी अर्धा स्क्वेअर मीटर म्हणजे ६ फूट जागा करणे , पार्किंग, फी परतावा, शैक्षणिक पात्रता, दंड रक्कम आणि कारवाई विरोधात दाद मागण्याची तरतूद, दुहेरी, इंटिग्रेटेड, टाय अप विरुद्ध क्लासेस बरोबरच शाळा, कॉलेज आणि संस्थेविरोधात कारवाई करणे, इन्स्पेक्टर राजला विरोध, कोचिंग क्लासेसचे ग्रामीण, तालुका, जिल्हा आणि महानगर असे वर्गीकरण करणे आणि त्याप्रमाणे विद्यार्थी संख्या लागू करणे, तसेच प्रस्तावित कायद्याच्या अंमलबजावणीमुळे उद्भवू शकणाऱ्या व्यावहारिक अडचणी आणि संभाव्य परिणामांकडे शासनाचे लक्ष वेधले.

प्रस्तावित कायद्यातील अनेक अन्यायकारक आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी न करता येणाऱ्या तरतुदीमुळे महाराष्ट्रातील सुमारे सात लाख लोकांचा शिक्षक म्हणून या क्षेत्रावर असणाऱ्या अवलंबनामुळे बेरोजगारीचा प्रश्न निर्माण होईल याचा शासनाने गांभीर्याने विचार करावा अशी भूमिका कुलकर्णी यांनी मांडली.

पंकज भोयर यांनी लाखो क्लास चालक व संबंधित लोकांच्या रोजगाराचा आणि विध्यार्थी हिताचा विचार करून कायदा करू असे आश्वासन दिले. या बैठकीमध्ये प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन (पीटीए) महाराष्ट्रच्या वतीने डॉ. पी. कुलकर्णी, दुर्गेश मंगेशकर आणि डॉ. नितीन कदम यांनी संशोधित केलेले, शिक्षण व्यवस्थेची संपूर्ण माहिती देणारे एक सविस्तर डॉक्युमेंट, भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये आणि समाज उद्धारामध्ये, शिक्षणामध्ये आणि अर्थव्यवस्थेमध्ये कोचिंग क्लासेसचे योगदान स्पष्टपणे दर्शवणारा एक व्हाइट पेपर डॉक्युमेंट, आतापर्यंत कोचिंग क्लासेस नियंत्रण कायद्यासंदर्भात वेगवेगळ्या नऊ राज्यांनी केलेले कायदे यांचा तुलनात्मक अभ्यास असलेले एक डॉक्युमेंट, तसेच कोचिंग क्लासेस क्षेत्राला अत्यंत सुव्यवस्थितपणे व्यावसायिक रूप देता यावे, यासाठी प्रगतशील कायदा कसा असावा ? असा एक आदर्श कायदा प्रारूप बनवून आणि मिरज येथे झालेल्या पीटीएच्या कोअर कमिटीच्या मीटिंगमध्ये कायद्याच्या संदर्भातल्या प्रत्येक तरतुदींसाठी असलेल्या सूचना, बदल, अपेक्षा यांचे सविस्तर निवेदन सरकारकडे सादर करण्यात आले.

या बैठकीसाठी महाराष्ट्रातील शिखर संघटना म्हणजे स्टेट कोसॉर्टियम ऑफ कोचिंग टीचर्स अँड इन्स्टिट्यूट (एससीसीटीआय) मध्ये ज्या नऊ संघटना उपस्थित होत्या, त्यामध्ये एमसीओए मुंबई चे सचिन नायकवडी, माजी अध्यक्ष प्रजेस ट्रॉट्स्की, सीसीपीए ठाणेचे अध्यक्ष सतीश देशमुख, उपाध्यक्ष प्रकाश पाटील, आरिफ शेख, एसीओएम मुंबई अध्यक्ष दिलीप मेहेंदळे, सीसीडब्ल्यूए नाशिकचे अध्यक्ष यशवंत बोरसे, एसीआय नागपूर चे उपाध्यक्ष डॉ. विराज मेटकरी, तसेच खाजगी कोचिंग क्लासेस संघ नागपूरचे अध्यक्ष सचिन गजभिये, सीसीए छत्रपती संभाजी नगरचे वाघ आणि पीटीएचे सेक्रेटरी डॉ.नितीन कदम कार्याध्यक्ष प्रल्हाद दौंड, कोअर कमिटी मेम्बर दुर्गेश मंगेशकर यांचा समावेश होता. या बैठकीच्या आयोजनामध्ये टार्गेट पब्लिकेशनचा कोचिंग क्लासेस संघटनांना सक्रिय पाठिंबा होता.

follow us