चार मुलांसाठी छळ सहन केला; मिस इंडिया अर्थ सायली सुर्वेची पुन्हा हिंदू धर्मात वापसी, नवं नावही दिलं
Sayali Surve-मूळ पिंपरी-चिंचवडची राहणारी सायली सुर्वे हिने 2019 मध्ये मीरा-भाईंदर येथील प्रतिष्ठीत उद्योजक आतिफ तासे याच्याशी लग्न केले आहे.
Sayali Surve: द केरळ स्टोरी 2 चित्रपटावरून सध्या वाद सुरू आहे. हा चित्रपट लव्ह जिहाद आणि हिंदू मुलींच्या जबरदस्तीने धर्मांतरावर आधारित आहे. या चित्रपटाची देशभर चर्चा असताना जबरदस्ती धर्मांतरण केल्याचे प्रकरण समोर आलंय. 2019 च्या मिस इंडिया अर्थ राहिलेली पिंपरी चिंचवड येथील सायली सुर्वे हिने एका परधर्मातील व्यक्तीशी प्रेमविवाह केला होता. धर्मांतरण करण्यासाठी दबाव टाकला. मानसिक व शारिरिक छळ केल्याचा आरोप सायली सुर्वे हिने केलाय. चार मुलांसाठी मी छळ सहन केल्याचे सायली सुर्वे हिने म्हटलंय. आता तिने पुन्हा हिंदू धर्मात वापसी केलीय.
मूळ पिंपरी-चिंचवडची राहणारी सायली सुर्वे हिने 2019 मध्ये मीरा-भाईंदर येथील प्रतिष्ठीत उद्योजक आतिफ तासे याच्याशी लग्न केले. या लग्नाला सुर्वे हिच्या घरच्यांचा विरोध होता. लग्नानंतर तिचे नाव बदलून अतेजा तासे ठेवण्यात आले होते. आतिफशी लग्न करणे ही तिची सर्वात मोठी चूक होती, असे सायली हिने म्हटलंय. लग्नानंतर तिला सतत मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला. धर्मांतर करण्यासाठी दबाव आणण्यात आल्याचा आरोप तिने केलाय.
मला चार मुले आहेत. केवळ त्यांच्या भविष्यासाठी आणि सहवासाठी मी दहा वर्षे हा छळ सहन केला असल्याचा दावाही सायली हिने केलाय. छळ आणि जबरदस्तीने धर्मांतर करण्यास भाग पाडल्याबद्दल अनेक वेळा पोलिस तक्रार दाखल केली. परंतु पोलिस प्रशासनाकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्या लोकांचे काही राजकीय लोकांशी संपर्क आहे. त्यामुळे माझ्या तक्रारीची दखल कुणी घेतली नसल्याचा आरोप सायली हिने केलाय.
शुद्धीकरणानंतर आद्या असं नवं नावं
काही हिंदू संघटनांच्या संपर्कात आली. त्यानंतर पुन्हा हिंदू धर्मात येण्याचा निर्णय झाला. पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष ‘होम-हवन’ आणि मंत्रोच्चाराने शुद्धीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. शुद्धीकरणानंतर, सायलीला आता ‘आद्या सुर्वे’ असे नाव देण्यात आले आहे. सायलीने आनंद व्यक्त केला आणि सांगितले की तिच्या समुदायात परतल्यानंतर तिला सुरक्षित वाटते.
