पवारसाहेबांनी मला शिक्षण विचारले आणि मंत्रिपद दिले; प्राजक्त तनपुरेंनी सांगितला किस्सा
पुणे: पुण्यात राष्ट्रवादीकडून अभियंता दिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात माजी मंत्री व आमदार प्राजक्त तनपुरे यांनी पहिल्याच टर्मला निवडून आल्यानंतर मंत्रिपद कसे मिळाले याचा किस्सा त्यांनी सांगितला आहे. पहिल्यांदा निवडून आल्यानंतर शरद पवार यांनी मला बोलवून घेतले होते. आमच्या जिल्ह्यातून नव्याने अनेक आमदार झाले होते. त्यामुळे मंत्रिपदासाठी जोरदार स्पर्धा होती. पण पवारसाहेबांनी मला माझे शिक्षण विचारले. मी अभियंता असल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी मला ऊर्जा खात्याची जबाबदारी दिली, असे तनपुरे यांनी म्हटले आहे.
Asia Cup 2023 : पावसामुळे उद्या सामना झाला नाही तर भारत की श्रीलंका कोण ठरणार चॅम्पियन?
या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील, रोहित पवार अन्य पदाधिकारी उपस्थित होते. तनपुरे म्हणाले, ऊर्जा खात्याच्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळत असताना काही तांत्रिक समजत होत्या. माझे ज्ञान एेवढे ही टाकाऊ नव्हते. त्यामुळे अधिकारी वेड्यात काढणार इतके तरी मला जमले होते.
लोकसभेच्या तोंडावर धमाका; सोलापुरला होणार मोठी कामगार वसाहत, मोंदीच्या हस्ते होणार लोकार्पण
इंजिनिअरिंग होण्याकरिता खूप चॅंलेजस होत्या. इजिनिअरिंगला कसरत करावी लागली. मला बारावीला चांगले गुण होते. त्यामुळे मी गणितात तज्ज्ञ समजत होतो. परंतु काही विषयांनी पाय जमिनीवर आणल्याचे तनपुरे यांनी सांगितले.
आपल्या नेत्यांची दूरदृष्टी होती. त्यामुळेच पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आयआयटीसारख्या संस्था स्थापन केल्या. त्यातून औद्योगीकरणाकडे आपली वाटचाल सुरू झाली आहे. देशाच्या जडणघडणीमध्ये उद्योग धंद्याचे महत्त्व आहे. सिव्हिल इंजिनियरिंगच्या क्षेत्रातील लोकांनी देशांमध्ये धरण, धरणे रस्ते बांधली आहेत. मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये देखील ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये मोठे बदल झाले आहेत. आयटीमध्ये भरभराट होत असल्याचे तनपुरे यांनी म्हटले आहे.
तनपुरे म्हणाले, आयटीमध्ये बसून काम केल्याने व्यायाम नसल्याने अनेक शारिरिक व्याधी निर्माण होतात.तर ग्रामीण भागात इंजिनिअरच्या वेगळे प्रश्न आहेत. ते अनेकदा सरकारी कामे मिळत नाही, असे ही सांगतात.