Pune Water Cut : पाणी कपातीचा निर्णय! आता रोज नाही. दिवसाआड पाणी येणार…
पुणे महापालिकेने पाणी कपातीचा निर्णय घेतला असून 15 जूनपासून एक दिवसाआड पाणी येणार असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलंय.
Pune Water Cut : पुण्यात येत्या 15 जूनपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याच्या निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासंदर्भातील वेळापत्रकच महापालिकेने जाहीर केलंय. काही दिवसांपूर्वीच महापौर मंजुषा नागपूरे यांनी महापालिका पाणीकपातीबाबत निर्णय घेणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. अखेर 15 जूनपासून पुण्यात रोज नाही तर दिवसाआड पाणी येणार आहे.
सम तारखेला पाणीपुरवठा होणारे विभाग आणि त्यांच्या वेळा…
भाग १: आपटे रोड, भांडारकर रोड, प्रभात रोड, लॉ कॉलेज रोड, पुलाची वाडी, शिवाजीनगर गावठाण, वैकुंठ स्मशान परिसर, समप म भवन, अमर सोसायटी, कोपन गल्ली, मोढ कॉलनी, विठ्ठलवाडी, माकेकर प्लॉट, राजपूत वसाहत, एरंडवणे गावठाण.
वेळ: पहाटे ५.०० ते ११.००
भाग २: मॉडेल कॉलनी, हनुमाननगर, वडारवाडी, शिवाजीनगर, रेखवे गल्ली.
वेळ: दुपारी ३.०० ते रात्री ८.००
भाग ३: जनवाडी, जनता वसाहत, वैदूवाडी, गोखलेनगर, श्रमिकनगर, आशानगर.
वेळ: रात्री ८.०० ते ११.३०
भाग ४: बोपोडी.
वेळ: सकाळी ४.०० ते १०.००
भाग ५: चिखलवाडी.
वेळ: रात्री ११.०० ते १.००
भाग ६: एसटीएम, अभिमानश्री सोसायटी, चतु:शृंगी नगर.
वेळ: सकाळी ८.०० ते दुपारी ३.००
भाग ७: बाणेर रोड उजवी बाजू, माळा पाणीपुरवठ्यातील सर्व भाग.
वेळ: दुपारी ११.०० ते ५.३०
भाग ८: औंध गाव, प्रीतम सोसायटी, इंदिरा वसाहत, कस्तुरबा वसाहत.
वेळ: दुपारी ३.०० ते १०.००
भाग ९: मोरेलगर, अशोकनगर, रेंजहिल, खडकी.
वेळ: दुपारी १.०० ते ५.००
भाग १०: संपूर्ण बालेवाडी गावठाण, बालेवाडी.
वेळ: दुपारी २.०० ते ८.३०
भाग ११: मोहननगर.
वेळ: पहाटे ७.३० ते १२.३०
भाग १२: धाकुडवस्ती, कपिल मल्हार परिसर, बाणेर गावठाण.
वेळ: सकाळी ४.३० ते ८.३०
भाग १३: वीरभद्रनगर, गणराज चौक, बाणेर स्मशानभूमी रोड, पारखी मळा, ज्युपिटर हॉस्पिटल, चाकणकर मळा.
वेळ: संध्याकाळी ५.३० ते २.३०
भाग १४: सुतारवाडी गावठाण, पाषाण पार्क.
वेळ: पहाटे ४.३० ते ७.३०
भाग १५: सुस रोड.
वेळ: सकाळी ११.३० ते १.३०
भाग १६: पंचवटी.
वेळ: दुपारी १२.३० ते ४.००
भाग १७: सुतारगाव.
वेळ: सकाळी ७.३० ते ९.३०
भाग १८: ससे गाव.
वेळ: सम व विषम तारखेला टँकरद्वारे पाणीपुरवठा
भाग १९: खडकी छावणी भाग, मुळा रोड.
वेळ: सकाळी ६.०० ते ११.३०
भाग २०: वारजे माळवाडी, कर्वेनगर पाट (ममता स्वीट्स ते विठ्ठल मंदिर रस्त्याची उजवी बाजू ते हायवेपर्यंतचा संपूर्ण भाग), रामनगर, शिवणे, उत्तमनगर, न्यू कोपरे, कोंढवे, औंधकरवस्तीतील लक्ष्मीनगर धाबडे, फक्त लक्ष्मीनगर.
दरम्यान, पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक असेच राहणार असून पाणी पुरवठ्याचे दैनंदिन वेळापत्रक तसेच राहील, तरीही एक दिवसाआड येणार आहे. शहरातील पर्वती एलएलआर, एसएनडीटी, चतुःश्रृंगी, होळकर, विद्यापीठ, चांदणी चौक, बाणेर, म्हाळुंगे, वारजे-माळवाडी, रामनगर, कोंढवे धावडे, शिवणे, श्रीहरी, केदारेश्वर आणि धनकवडी परिसरातील नागरिकांना सम तारखांना पाणीपुरवठा केला जाईल. तर कोथरूड (लक्ष्मीनगर वगळता), बावधन, एरंडवणेचा काही भाग, संतोषनगर, आंबेगाव खुर्द, महादेवनगर, कात्रज गावठाण, सुखसागरनगर, बिबवेवाडी, लोअर इंदिरानगर, सेमिनरी हिल आणि पर्वती दर्शन परिसरांना विषम तारखांना पाणी मिळेल.