पुण्यातील तिहेरी हत्याकांड: ‘जय भीम’ टॅटू तपासात महत्त्वाचा धागा…

पुण्यातील तिहेरी हत्याकांड: ‘जय भीम’ टॅटू तपासात महत्त्वाचा धागा…

Pune Triple Murder Case : पुणे जिल्ह्यातील रांजणगाव खंडाळे (ता. शिरूर) येथे रविवारी सकाळी घडलेल्या तिहेरी हत्याकांडाने (Pune Triple Murder Case) संपूर्ण पुणे (Pune) जिल्हा हादरला आहे. 25 वर्षीय तरुणी आणि दोन चिमुकल्यांचे अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या तीनही मृतांना जिवंत जाळण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात असून, पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे.

दरम्यान, ग्रोवेल कंपनीच्या मागील बाजूस, मुख्य महामार्गालगत हे मृतदेह आढळून आले असून मृतांमध्ये चार वर्षांच्या मुलाचा व दीड वर्षांच्या छोट्या बाळाचा समावेश असल्याचची प्राथमिक माहिती तपासात निष्पन्न झाली आहे. मृतदेह इतके जळाले होते की, त्याची ओळख पटवणे अवघड जात आहे. मात्र, यातील मयत महिलेच्या उजव्या हातावर ‘जय भीम’ असा टॅटू आढळून आल्याने पोलिसांना तपासात महत्त्वाचा धागा सापडला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार तिघांना इतर ठिकाणी मारून नंतर येथे आणले गेले आणि त्यांच्या शरीरावर पेट्रोल टाकून मृतदेह पेटवण्यात आल्याचे समजते.मात्र, पावसामुळे आग पूर्णपणे न विझल्याने काही पुरावे मिळाले आहेत. दरम्यान, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाचे आदेश दिले आहेत.

‘तुझा नंबर दे… सेक्सी दिसतेस’, ‘कोण होतीस तू’ फेम सुदेश म्हशीलकरचा मराठी अभिनेत्रीला अश्लील मेसेज

याबाबत परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी सुरु असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. मात्र या अमानुष हत्याकांडामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलीस यंत्रणा मारेकऱ्यांच्या शोध घेत आहेत. या हत्याकांडात तपासाअंती काय खुलासे होतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र आई समवेत छोट्या बाळांचा जळलेला मृतदेह पाहून जनमानसात हळहळ व्यक्त केली जात आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या