डॉ. जयंत नारळीकर यांना पत्नीवियोग; ज्येष्ठ गणितज्ञ डॉ. मंगला नारळीकर काळाच्या पडद्याआड

  • Written By: Published:
डॉ. जयंत नारळीकर यांना पत्नीवियोग; ज्येष्ठ गणितज्ञ डॉ. मंगला नारळीकर काळाच्या पडद्याआड

पुणे : ज्येष्ठ गणितज्ञ, शास्त्रज्ञ आणि लेखिका डॉ. मंगला नारळीकर (वय 79) यांचे आज (17 जुलै) निधन झाले. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या पत्नी होत्या. नारळीकरांना त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत पत्नी आणि सहकारी म्हणून मंगलाताईंची खंबीर साथ लाभली. मागील काही महिन्यांपासून त्या कर्करोगाच्या आजाराने ग्रस्त होत्या. (Senior Mathematician, Scientist and Writer Dr. Mangala Narlikar passed away)

डॉ. मंगला नारळीकर यांचा जन्म 17 मे 1943 रोजी राजवाडे कुटुंबात झाला. 1962 साली डॉ. मंगला नारळीकर यांनी मुंबई विद्यापीठातून बीए ची पदवी घेतली. पुढे त्यांनी गणित विषयात एम.ए करत विद्यापीठातून पहिला क्रमांक पटकावला. त्यावेळी त्यांना सुवर्णपदक मिळाले होते. पुढे 1965 साली त्यांचा डॉ. जयंत नारळीकर यांच्यासोबत विवाह झाला. यानंतर 1966 मध्ये मुंबईत गणित विद्यालयात सहायक संशोधक आणि नंतर सहयोगी संशोधक म्हणून डॉ. मंगला नारळीकर यांनी काम केले. नंतर केंब्रिज विद्यापीठात 1969 साली गणित विषयांचे अध्यापन केले.

जनमत भाजप विरोधात, म्हणून साम, दाम, दंड…; खासदार कोल्हेंचं खळबळजनक वक्तव्य

संस्कृत पंडित सुमती नारळीकर या त्यांच्या सासू, तर बनारस हिंदू विद्यापीठातील गणिताचे माजी प्राध्यापक विष्णू वामन नारळीकर हे मंगलाबाईंचे सासरे होते. त्यादेखील पती प्रमाणे शास्त्रज्ञ होत्या. परंतु त्यांचा हातकंडा लहान मुलांना सोप्या भाषेत गणित समजून सांगण्यात होता. त्यांनी अनेक मराठी आणि इंग्रजी पुस्तक लिहिली. यामध्ये विशेष गणिताच्या सोप्या वाटा, नभात हसरे तारे, पाहिलेले देश, भेटलेली माणसं हे पुस्तक गाजली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube