…तर गायी 60 लिटर दूध देतील; गडकरींनी सांगितलं दूध उत्पादन वाढीचं तंत्र
बारामती : जगात पशुसंख्येच्या बाबतीत भारताचा पहिला क्रमांक आहे. मात्र, दूध उत्पादन कमी आहे. हे दुरूस्त करायचं असेल तर या जनावरांमध्ये सिमेन्स सुधारण्याचा कार्यक्रम हाती घेतला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं. अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारातमी येथील पहिले देशी गोवंश सुधारणा प्रकल्प आणि एम्ब्रियो ट्रान्सफर लॅबोरेटरीचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलतांना पवार म्हणााले, आज भारत हा सर्वांत जास्त दूध उत्पादन करणार देश आहे. मात्र, सरासरी भारतीय गायींचे दूध देण्याचे प्रमाण प्रति दिवसाला 8 ते 10 लिटर एवढचं आहे. त्यामुळे सध्याच्या संकरित गाई सोबतच देशी गाय आणि म्हशीमधील दुधाचे उत्पादन वाढवणं गरजेचं आहे. त्यासाठी देशी गोवंश सुधारणा प्रकल्पाचं काम होती घेण्यात आलं. दूध वाढवण्याच्या उत्पादनातील समस्येची काही कारणे आहेत. दुधाची कमी उत्पादकता हे बळीराजासमोरचं मोठं आव्हान आहे. पशु काळजीचा अभाव, अपुरं खाद्य याचा परिणाम दूध उत्पादनावर होतो. ही कारणं असून त्या सर्व समस्या या प्रकल्पाच्या माध्यतातून दूर केल्या जातील. त्यामुळे दुधाळ जनावरांची निर्मिती करण्यासाठी हा प्रकल्प कसा महत्वाचा आहे, हे पटवून देण्याचं काम पवारांनी केलं.
यावेळी बोलतांना नितीन गडकरी यांनीही या प्रकल्पाचं कौतूक केलं. हा ऐतिहासिक आणि क्रांतिकारक प्रकल्प आहे. आज तुमच्याकडे जर ४० लिटर हे रोजचं दूध असेल तर आणि तुम्ही या प्रकल्पासोबत चालला तर तेवढ्यात गायीचं तुमचं उत्पन्न तीन पटींनी वाढेल. त्यामुळे हा प्रकल्प बळीराजांच जीवन बदलू शकतं. यावेळी गडकरी यांनी एक उदाहरणं दिलं. ते म्हणाले, १९५२ साली गिर नावाची गाय ब्राझिलमध्ये गेली. आणि त्यानंतर ती साठ लिटरपर्यंत दूध द्यायला लागली. त्या गाईला एक सांड झाला, टोरॅंटो. साठ लिटर गायींचा जो बुल होता, त्याचं सिमेन्स जर दोन लिटरच्या गाईला दिलं. तर आपल्याला जी गोरी मिळणार आहेत, ती २० लिटर दूध देणारी मिळतील. या टेक्नोलॉमध्ये ९९ टक्के गोरी होते. गोरा होत नाही. त्यामुळे शेतकऱ्याचा दोन्ही बाजूने फायदा होतो, असं गडकरी म्हणाले.
सोमय्यांचा घणाघात! म्हणाले, ठाकरेंच्या राज्यात अनिल परबांनी..
या प्रयोगातून तयार होणाऱ्या कारवाडी, २५ लिटर, ३० लिटर, ५० लिटर दूध देतील. त्यामुळे दुधाचं उत्पादन वाढलं तर शेतकऱ्याला दूध हा पुरक व्यवसाय होईल आणि त्याच्या जगण्याला समृध्दता येईल, असं गडकरी म्हणाले.
या कार्यक्रमासाठी पवार-गडकरींसोबत विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार होते. आमदार रोहित पवार आदि उपस्थित होते.