श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी सुनील रासने यांची एकमताने निवड
Sunil Rasane : सुनील रासने यांची आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या (Shrimant Dagdusheth Halwai Ganapati Trust) अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. रासने सध्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे विद्यमान उपाध्यक्ष आहे. विश्वस्त मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, सुनील रासने यांची पुढील 2 वर्षांकरिता अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच माजी अध्यक्ष माणिक चव्हाण यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली असल्याची माहिती देखील यावेळी विश्वस्त मंडळाने दिली.
ट्रस्टच्या सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक उपक्रमांमध्ये गेल्या 45 वर्षांपासून सुनील रासने सक्रिय असतात तसेच कोविड काळात ट्रस्टने केलेल्या मदतकार्यात स्वत: रस्त्यावर उतरुन लोकांची मदत केली होती. तसेच दिराच्या दैनंदिन व्यवस्थापनात म्हणजेच स्वच्छता, दानपेटी सारख्या विषयात ते स्वत: लक्ष देत असतात. रासने यांच्या आवाजातील गणपती बाप्पाची महाआरती सर्वत्र प्रसिद्ध असून आजही ते स्वत: आरती म्हणतात.
तर 15 सप्टेंबर 2022 साली झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत ट्रस्टच्या पुढील 14 वर्षांच्या अध्यक्षपदाबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार सन 2022 ते 2024 याकाळात माणिक चव्हाण यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. त्यावेळी विश्वस्त मंडळात इतर पदभार देखील बदलण्यात आले होते. ते 2024 ते 2026 या कालावधीकरिता कायम ठेवण्यात आले आहेत.
सन 2024 ते 2026 याकरिता ट्रस्टच्या अध्यक्षपदी सुनील रासने (Sunil Rasane) , उपाध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सहचिटणीस अमोल केदारी, विश्वस्त कुमार वांबुरे, मुरलीधर लोंढे, उत्तमराव गावडे हे वरील पदांवर कार्यरत राहणार आहेत.
मागील बैठकीतील निर्णयानुसार 14 वर्षांचे नियोजीत अध्यक्ष सन 2022 ते 2024 याकरिता ट्रस्टच्या अध्यक्षपदी माणिक चव्हाण यांनी कार्यकाळ पूर्ण केला. आता सन 2024 ते 2026 अशा दोन वर्षांकरीता ट्रस्टच्या अध्यक्षपदी सुनील रासने, सन 2026 ते 2031 या पुढील पाच वर्षांकरीता महेश सूर्यवंशी आणि सन 2031 ते 2036 या त्या पुढील पाच वर्षांकरीता हेमंत रासने हे ट्रस्टचे अध्यक्षपद भूषविणार आहेत.
उमेदवारी न बदलल्यास…, इशारा देत मुंडे व दौंड यांनी राजळेंविरोधात थोपटले दंड
विश्वस्त मंडळाच्या बैठकीला ट्रस्टचे माजी अध्यक्ष माणिक चव्हाण, माजी उपाध्यक्ष सुनील रासने, विद्यमान उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सहचिटणीस अमोल केदारी आदी उपस्थित होते. सुनील रासने हे ट्रस्टचे विद्यमान उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते.