धक्कादायक घटना ! महिलेसह तिच्या दोन मुलांना जिवंत जाळले

Untitled Design   2023 04 06T085549.258

पुणे : माणसातील क्रूरता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. असाच काहीसा खळबळजनक प्रकार पुण्यात घडला आहे. अनैतिक सबंधातून एका महिलेला तिच्या दोन लहान मुलांसह जिवंत जाळण्यात आले आहे. हा धक्कादायक प्रकार पुणे शहरातील कोंढवा परिसरातील पिसोळी भागात घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे आरोपी हा महिलेचा पुतण्या असून त्याने अनैतिक संबंधातून हे धक्कादायक कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

वैभव वाघमारे असे खून करणाऱ्या आरोपीचे नाव आहे तर या हत्याकांडात अम्रपाली वाघमारे असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. तसेच मृतांमध्ये सहा वर्षांची मुलगी व चार वर्षाच्या मुलाचा देखील समावेश आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, आरोपी वैभव वाघमारे (वय 30 वर्ष, रा.मुक्काम पो. लोटा ता. औसा जि. लातूर) यांने त्याच्याच नात्यातील महिला आम्रपाली वाघमारे (वय 25 वर्ष) हीचे दुसऱ्या पुरुषांशी अनैतिक संबंध असल्याचे कारणावरून वाद झाला. या गोष्टीचा राग आल्याने वैभवने रागाच्या भरात आम्रपाली वाघमारे हिचा व तिची लहान मुलगी नामे रोशनी (वय 6 वर्ष) व मुलगा नामे आदित्य (वय 4 वर्ष) यांना हाताने गळा दाबून जीवे ठार मारून टाकले.

युवासेनेची रणरागिनी हरपली, दुर्गा शिंदे यांचं हृदयविकाराने निधन

आरोपीने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांचे मृतदेह खोलीच्या समोरील पत्र्याच्या शेडमध्ये नेऊन घरातील कपडे बेडशीट व लाकडे यांच्या साह्याने सादर मृतदेह जाळले. बुधवारी रात्री साडे अकराच्या सुमारास कोंढवा पोलिसांना याची माहिती मिळाली. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता हे भयानक दृश्य समोर आले.

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा राडा, ‘या’ ठिकाणी घडली घटना

दरम्यान पोलिसांनी तातडीने आरोप वैभवला अटक केली आहे. वैभव हा पिसोळी येथे सुरक्षा रक्षकाचे काम करत होता.दरम्यान पुण्यात झालेल्या या धक्कादायक हत्याकांडाने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहे.

Tags

follow us