पक्षासाठी त्यांनी काय केलं ? गोऱ्हे यांच्या विधानपरिषदेच्या उमेदवारीला महिला आघाडीचा उघड विरोध
Vidhan Parishad Election 2026-शिवसैनिकांकडून दोघांच्या नावाला विरोध होत आहे. निलम गोऱ्हे यांच्याविरोधात तर आता पुण्यात पत्र काढण्यात आलेले आहे.
Vidhan Parishad Election 2026: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या (Vidhan Parishad Election 2026) नऊ जागांसाठी उमेदवारी दाखल करण्यासाठी शेवटचे तीन दिवस राहिले आहे. परंतु महायुती, महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवार जाहीर झालेले नाहीत. भाजपला पाच जागा जाणार असून, भाजपचे उमेदवार दिल्लीत ठरणार आहे. तर इकडे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचेही उमेदवार ठरलेले नाहीत. आमदाराच्या संख्यामुळे शिवसेनेला दोन जागा मिळू शकतात. ते दोन उमेदवार कोण याचे नावे अंतिम होत आलेले आहेत. विधानपरिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) आणि माजी आमदार बच्चू कडू यांचे नाव अंतिम समजले जात आहे. त्यात आता शिवसैनिकांकडून दोघांच्या नावाला विरोध होत आहे. निलम गोऱ्हे यांच्याविरोधात तर आता पुण्यात पत्र काढण्यात आलेले आहे.
एकनाथ शिंदेंचा पवार ठाकरेंना धक्का, लातूरमध्ये बड्या नेत्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच पत्र पाठविण्यात आलेले आहे. उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पुन्हा विधान परिषदेची उमेदवारी न देण्याची मागणी पत्रातून करण्यात आली आहे. पक्ष संघटनेसाठी नीलम गोऱ्हे यांनी काही केले नाही. उलट महिलांचे खच्चीकरण होईल यावर त्यांनी भर दिल्याचा आरोप या पत्रातून करण्यात आला आहे. पुणे जिल्हा शिवसेना महिला आघाडीने हे पत्र काढले आहे.
मस्साजोगच्या सरपंचपदासाठी उद्या मतदान; संतोष देशमुखच्या मुलांचा आईसाठी प्रचार
महिलांचे चरित्र हनन करून भांडणे लावली
महिलांचे चरित्र हनन करुन त्यांच्यात भांडणे लावून संघटनेचे मोठे नुकसान केले आहे. नीलम गोऱ्हे या सर्वांना एकनाथ शिंदे यांनी पुन्हा आमदार करणार असल्याचा शब्द दिला असल्याचे सांगत आहेत. नीलम गोऱ्हे यांच्या ऐवजी सामान्य शिवसैनिकाला उमेदवारी दिली तर कार्यकर्ता तुम्हाला सलाम करेल असे या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. अन्यथा उध्दव ठाकरे यांच्याप्रमाणे तुम्हाला पुन्हा एकदा बाईने फसवले असे पत्रात म्हटले आहे. एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या पत्रात तारीख व कुणाचे नाव नाही. त्यावर फक्त पुणे जिल्हा शिवसेना महिला आघाडी असं म्हटलं आहे.