विनायकी क्रीडा महोत्सवानिमित्त आंतरराष्ट्रीय खुल्या रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत जगभरातून 400खेळाडू सहभागी

कै. विनायक निम्हण यांच्या जयंती निमित्त विनायकी क्रीडा महोत्सव आंतरराष्ट्रीय खुल्या रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत जगभरातून सहभाग नोंदवला.

  • Written By: Published:
News Photo   2026 07 31T140931.128

Vinayaki Sports Festival : सोमेश्वर फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित माजी आमदार कै. विनायक निम्हण यांच्या जयंती निमित्त विनायकी क्रीडा महोत्सव आंतरराष्ट्रीय खुल्या रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत जगभरातून 400खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. हि स्पर्धा पाषाण सुस रोड येथील पेरी डॉट हॉल, सनीज वर्ल्ड या ठिकाणी 1 व 2 ऑगस्ट 2026 रोजी रंगणार आहे. स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना सोमेश्वर फाउंडेशनचे सदस्य व नगरसेवक सनी निम्हण यांनी सांगितले की, “कै. विनायक निम्हण यांनी नेहमीच क्रीडा आणि युवा विकासाला प्राधान्य दिले.

त्यांच्याच प्रेरणेतून विनायकी क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून विविध खेळांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. बुद्धिबळ हा बौद्धिक क्षमता, संयम आणि निर्णयक्षमता विकसित करणारा खेळ असून, या आंतरराष्ट्रीय खुल्या रॅपिड रेटिंग स्पर्धेत देश-विदेशातील खेळाडूंना एकाच व्यासपीठावर स्पर्धा करण्याची संधी मिळत आहे. भविष्यातही पुणे शहराला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा स्पर्धांचे केंद्र बनविण्यासाठी सोमेश्वर फाउंडेशन सातत्याने प्रयत्नशील राहील,”

नवे शिक्षणमंत्री म्हणजे एक वाईट विनोद; भाजपा नेत्याच्या लेकीची केंद्र सरकारवर खरमरीत टीका

स्पर्धेत नेडलँड, मॉरिशस या देशांसह भारतातून महाराष्ट्र, केरळ,पश्चिम बंगाल, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, तामिळनाडू या राज्यातून 400खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. हि स्पर्धा ऑल इंडिया चेस फेडरेशन, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना, पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कल यांच्या मान्यतेखाली होत असून स्पर्धेत एकूण 2,00,000 रोख पारितोषीकांसह खेळाडूंना प्रशस्तीपत्र व करंडक देण्यात येणार आहेत.

स्पर्धेत मध्यप्रदेशचा फिडे मास्टर आरएस गुप्ता, कॅडेट मास्टर आशिष चौधरी, कॅडेट मास्टर अलौकिक सिन्हा, सिद्धांत साळुंखे, महिला कॅडेट मास्टर अनुष्का कुतवळ, अविरत चौहान, मिहिर सरवदे यांसह नेदरलँडचा अनय पाटील, मॉरिशसचा श्रीहण जोशी यांसारखे 300 रेटेड खेळाडू आणि 100 अन रेटेड खेळाडू, असे एकूण 400 खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार आहे. खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. एमसीएचे सह सचिव राजेंद्र कोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडत असून आयए पवन राठी हे चीफ आरबीटर, तर आयए जुईली कुलकर्णी डेप्युटी चीफ आरबीटर म्हणून काम पाहणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन पुण्याचे उप महापौर परशुराम वाडेकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

follow us