न्यूझीलंडमध्ये धावांचा अभिषेक! 199 धावांचं लक्ष्य भेदत विजय मिळवला, अनेक विक्रम मोडले
Abhishek Sharma T20 Records; न्यूझीलंडविरुद्धाच्या या सामन्यात भारताने 199 धावांचं लक्ष्य फक्त 13.2 षटकात भेदलं आणि भारताला विजय मिळवून दिला.
India vs New Zealand T20 Abhishek Sharma T20 Records: टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिसऱ्या टी-20 सामन्यात अभिषेक शर्माने तुफान खेळी केली. त्याने अवघ्या 38 चेंडूत 113 धावा काढून सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. न्यूझीलंडविरुद्धाच्या या सामन्यात भारताने 199 धावांचं लक्ष्य फक्त 13.2 षटकात भेदलं आणि भारताला विजय मिळवून दिला. युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीनेही अभिषेक शर्माला चांगली साथ दिली. या दोघांनी अवघ्या 4.1 षटकांत 133 धावांची आक्रमक भागीदारी करत न्यूझीलंडच्या गोलंदाजांची दमछाक केली. वैभवने केवळ 19 चेंडूंत 44 धावा ठोकत सामन्याचं चित्र बदललं. दुसरीकडे, अभिषेकने अवघ्या 14 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं आणि त्यानंतर केवळ 35 चेंडूंत शतक झळकावलं.
1 नोव्हेंबरपासून दारू खरेदीचे नियम बदलले; 1 हजारांवरील बिलासाठी UPI पेमेंट अनिवार्य
अभिषेकच्या नावावर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चार शतकं
या दमदार शतकासह अभिषेकच्या नावावर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चार शतकं जमा झाली आहेत. भारताकडून या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्याने सूर्यकुमार यादवची बरोबरी केली आहे. या दोघांनीही प्रत्येकी चार शतकं केली आहेत, तर पाच शतकांसह रोहित शर्मा या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.
अभिषेकने आपल्या खेळीत 11 षटकार आणि 8 चौकार लगावत 113 धावा केल्या. विशेष म्हणजे, त्याचा स्ट्राइक रेट 297.37 इतका होता. त्याच्या या वादळी खेळीमुळे भारतीय संघाने न्यूझीलंडवर पूर्णपणे वर्चस्व गाजवलं आणि सामन्यात शानदार विजय मिळवला.
तीन शतकं झळकावणारा तो जगातील पहिलाच फलंदाज
अभिषेक शर्माने आपल्या वादळी फलंदाजीच्या जोरावर आणखी एका ऐतिहासिक विक्रमाला गवसणी घातली आहे. टी-20 क्रिकेटमध्ये 40 किंवा त्यापेक्षा कमी चेंडूंत तीन शतकं झळकावणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे. याआधीही अभिषेकने आपल्या आक्रमक फलंदाजीची ताकद दाखवून दिली होती. गेल्या महिन्यात दिल्लीमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध त्याने अवघ्या 30 चेंडूंत, तर मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध 37 चेंडूंत शतक पूर्ण केलं होतं. आता न्यूझीलंडविरुद्धच्या शतकामुळे त्याच्या या विक्रमी कामगिरीत आणखी एका शतकाची भर पडली आहे.
मोठी बातमी! ‘या’ शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत मिळणार नाही; काय आहेत कारणं?
अभिषेक शर्माचा हा विक्रम आणखी खास आहे. कसोटी खेळणाऱ्या देशांमधील किंवा असोसिएट देशांतील एकाही फलंदाजाला यापूर्वी 40 किंवा त्यापेक्षा कमी चेंडूंत तीन शतकं झळकावता आलेली नाहीत. इतकंच नाही, तर इतर कोणत्याही फलंदाजाला अशी कामगिरी दोन वेळाही करता आलेली नाही. याशिवाय, टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 35 किंवा त्यापेक्षा कमी चेंडूंत दोन शतकं झळकावणारा अभिषेक हा पहिलाच फलंदाज ठरला आहे. आपल्या आक्रमक फलंदाजीने त्याने जागतिक क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला आहे.
कमी चेंडूंत चार वेळा शतक झळकावलं
टी-20 क्रिकेटच्या सर्व प्रकारांमध्ये म्हणजेच आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत आणि फ्रँचायझी स्पर्धांमध्येही अभिषेक शर्माने आपली छाप सोडली आहे. त्याने 35 किंवा त्यापेक्षा कमी चेंडूंत चार वेळा शतक झळकावलं असून, अशी कामगिरी करणाऱ्या फलंदाजांमध्ये तो अव्वल स्थानावर आहे. उर्विल पटेल आणि वैभव सूर्यवंशी यांनी प्रत्येकी दोन वेळा अशी कामगिरी केली आहे.
याशिवाय, टी-20 क्रिकेटमध्ये 40 किंवा त्यापेक्षा कमी चेंडूंत शतक झळकावण्याच्या बाबतीतही अभिषेक आघाडीवर आहे. त्याने आतापर्यंत पाच वेळा हा पराक्रम केला आहे. उर्विल पटेल आणि वैभव सूर्यवंशी यांनी प्रत्येकी तीन वेळा अशी शतकं झळकावली असून, ते या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
न्यूझीलंडविरुद्ध अवघ्या 35 चेंडूंत शतक ठोकत अभिषेक शर्माने इशान किशनचा विक्रम मागे टाकला. इशानने जानेवारीमध्ये तिरुवनंतपुरम येथे न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पाचव्या टी-20 सामन्यात 42 चेंडूंत शतक पूर्ण केलं होतं. मात्र, अभिषेकने त्यापेक्षाही कमी चेंडूंत शतक झळकावत नवा विक्रम आपल्या नावावर केला.
श्रीलंकेच्या कुसल परेराही रेकॉर्ड मोडला
अभिषेकने न्यूझीलंडच्या भूमीवरही इतिहास रचला आहे. तिथे 40 पेक्षा कमी चेंडूंत टी-20 शतक झळकावणारा तो पहिलाच फलंदाज ठरला आहे. याआधी हा विक्रम श्रीलंकेच्या कुसल परेराच्या नावावर होता. त्याने 2015 मध्ये नेल्सन येथे 44 चेंडूंत शतक झळकावलं होतं. अभिषेकच्या आक्रमक खेळीमुळे आता हा विक्रमही मोडीत निघाला आहे.
कर्जतच्या टोरंट प्रकल्पावरून संघर्ष पेटला; फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
अभिषेक शर्माने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणखी एका विक्रमाची नोंद केली आहे. त्याने आतापर्यंत तीन वेळा अवघ्या 15 किंवा त्यापेक्षा कमी चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं आहे. विशेष म्हणजे, इतर कोणत्याही फलंदाजाला अशी कामगिरी एकापेक्षा जास्त वेळा करता आलेली नाही. त्यामुळे कमी चेंडूंत वेगवान धावा करण्याच्या बाबतीत अभिषेकने आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
जास्त षटकार मारण्याची त्याची ही तिसरी वेळ
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्माने 11 षटकार ठोकले. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका डावात 10 किंवा त्यापेक्षा जास्त षटकार मारण्याची त्याची ही तिसरी वेळ ठरली. कसोटी खेळणाऱ्या देशांतील फलंदाजांचा विचार करता, अशी कामगिरी सर्वाधिक वेळा करणारा अभिषेक पहिलाच फलंदाज बनला आहे.
शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारची मोठी तयारी; केंद्राकडं 40 हजार कोटींची मागणी
याआधी अॅरॉन फिंच आणि ख्रिस गेल यांनी प्रत्येकी दोन वेळा एका डावात 10 किंवा त्यापेक्षा जास्त षटकार मारले होते. मात्र, सर्व देशांतील खेळाडूंचा विचार केल्यास मलेशियाचा करणबीर सिंग या बाबतीत आघाडीवर आहे. त्याने पाच वेळा एका डावात 10 किंवा त्यापेक्षा जास्त षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे.