रणजी पदार्पणातच अर्जुन तेंडुलकरने झळकावले झंझावाती शतक

Arjun Twitter 17

मुंबई : क्रिकेटचा देव म्हणून ओळख असलेला सचिन तेंडुलकरचा मुलगा अजुर्न तेंडुलकर याने रणजी पदापर्णातच झंझावती शतक झळकावले आहे. अर्जुनने राजस्थानविरुद्ध झंझावाती शतक झळकावून गोव्यासाठी रणजी करंडक क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली. यासह अर्जुनने त्याचे वडील आणि महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

अर्जुनने रणजी ट्रॉफीच्या एलिट ग्रुप सी सामन्यात गोव्यासाठी 7 व्या क्रमांकावर फलंदाजी करताना पदार्पणाच्या सामन्यात झंझावाती शतक ठोकले आहे. अर्जुन तेंडुलकरने 15 चौकार आणि 2 षटकारांसह 112 धावा केल्या आहेत.

अर्जुन तेंडुलकरने या डावात सुयश प्रभुदेसाईसोबत 200 हून अधिक धावांची विक्रमी भागीदारीही केली. दोघांनी 333 चेंडूत 200 धावा जोडल्या, त्यात अर्जुनचे योगदान अधिक होते.

इंडियन प्रीमियर लीगमध्ये अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सकडून खेळतो, जरी त्याला अद्याप पदार्पण करण्याची संधी मिळाली नाही. मिनी लिलावापूर्वी त्याला मुंबईने कायम ठेवले होते. रणजी ट्रॉफी स्पर्धेपूर्वी अर्जुन तेंडुलकर विशेष प्रशिक्षण घेत होता.

Tags

follow us