ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या कसोटीसाठी इंग्लंड संघ जाहीर; ‘या’ खेळाडूला अखेर मिळाली संधी
AUS vs ENG : अॅशेस मालिकेतील शेवटच्या आणि पाचव्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने 12 जणांचा संघा जाहीर केला आहे. पाचव्या कसोटी सामन्यासांठी
AUS vs ENG : अॅशेस मालिकेतील शेवटच्या आणि पाचव्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने 12 जणांचा संघा जाहीर केला आहे. पाचव्या कसोटी सामन्यासांठी इंग्लंडकडून दोन मोठे बदल करण्यात आले आहे. ऑफ-स्पिनर शोएब बशीर आणि वेगवान गोलंदाज मॅथ्यू पॉट्स यांचा 12 सदस्यीय संघात समावेश करण्यात आला आहे. सिडनी येथे होणारा पाचवा कसोटी सामना 4 जानेवारीपासून सुरू होणार आहे.
2014 मध्ये भारताविरुद्ध कसोटी पदार्पण करणाऱ्या 22 वर्षीय शोएब बशीरने (Shoaib Bashir) 19 कसोटी सामने खेळले आहेत आणि 39.00 च्या सरासरीने 68 विकेट्स घेतले आहेत. ऑफ-स्पिनरने आतापर्यंत कसोटीत दोन वेळा चार विकेट्स आणि चार वेळा पाच विकेट्स घेतले आहेत. सध्याच्या अॅशेस मालिकेत इंग्लंडने पहिल्यांदाच स्पेशालिस्ट स्पिनरचा समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी, अष्टपैलू विल जॅक्स हा संघाचा एकमेव फिरकी गोलंदाज होता.
27 वर्षीय मॅथ्यू पॉट्सने (Matthew Potts) जून 2022 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध लॉर्ड्सवर कसोटी पदार्पण केले होते. मॅथ्यू पॉट्सने आतापर्यंत 10 सामने खेळले असून त्याने 29.44 च्या सरासरीने 36 विकेट्स घेतल्या आहेत, ज्यामध्ये दोन वेळा चार विकेट्सचा समावेश आहे. तर दुसरीकडे मेलबर्नमधील बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियाला चार विकेट्सने पराभूत करणाऱ्या संघातून वेगवान गोलंदाज गस अॅटकिन्सन या सामन्यातून बाहेर झाला आहे. हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे अॅटकिन्सन पाचव्या कसोटीतून बाहेर पडला आहे. या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलिया 3-1 ने आघाडीवर आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या अॅशेस कसोटीसाठी इंग्लंडचा संघ
: बेन स्टोक्स (कर्णधार), शोएब बशीर, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, झॅक क्रॉली, बेन डकेट, विल जॅक्स, मॅथ्यू पॉट्स, जो रूट, जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), जोश टंग.
