ब्रेकिंग न्यूज: बेन स्टोक्स म्हणाला ‘गुडबाय’ ! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती; इंग्लंडला मोठा धक्का

Ben Stokes- रविवारी सकाळी खेळ सुरू होण्यापूर्वी स्टोक्सने आपल्या सहकाऱ्यांना आणि इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) ला आपल्या निर्णयाची माहिती दिली.

  • Written By: Published:
Ben Stoks

Ben Stokes retire from international cricket: इंग्लंडचा (England) कर्णधार बेन स्टोक्स (Ben Stokes) याने रविवारी एक मोठा निर्णय घेत क्रिकेट विश्वासाला जोरदार धक्का दिलाय. त्याने न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलीय.

याआधी न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत स्टोक्स खेळला नव्हता. नाईटक्लबमधील वादामुळे त्याला संघाबाहेर ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेतले जाईल, तसेच तो निवृत्ती घेऊ शकतो, अशा चर्चांना उधाण आले होते. पण दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडच्या विजयांनंतर स्टोक्स आणि गस अ‍ॅटकिन्सन यांचे संघात कमबॅक झाले. दोघांनाही नाईटक्लब प्रकरणात लेखी इशारा देण्यात आला होता. तिसऱ्या कसोटीत स्टोक्स पुन्हा कर्णधार म्हणून मैदानात उतरला. त्यानंतर चौथ्या दिवशी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याची घोषणा केलीय.

क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार रविवारी सकाळी खेळ सुरू होण्यापूर्वी स्टोक्सने आपल्या सहकाऱ्यांना आणि इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) ला आपल्या निर्णयाची माहिती दिली.


तब्बल पंधरा वर्षे इंग्लंडसाठी गाजविले

स्फोटक फलंदाज बेन स्टोक्सने तब्बल 15 वर्षे इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले. तर चार वर्षे संघाचे नेतृत्व केले. इंग्लंडच्या इतिहासातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये त्याची गणना होते. अनेक ऐतिहासिक विजयांमध्ये त्याने महत्त्वाची भूमिका बजावली.

सर्वच प्रकारच्या क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी

कसोटी: 7,228 धावा (सरासरी 34.58)
कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या: 258
कसोटी शतके: 14
एकदिवसीय क्रिकेट: 3,463 धावा (सरासरी 41.22)
स्ट्राइक रेट: 95.68
T20 क्रिकेट: 3,027 धावा (स्ट्राइक रेट 132.87)
T20 मधील सर्वोच्च धावसंख्या: नाबाद 107

कारकिर्दीतील संस्मरणीय खेळी
2019 वनडे विश्वचषक अंतिम सामना: न्यूझीलंडविरुद्ध नाबाद 84 धावा करून इंग्लंडला ऐतिहासिक विश्वविजेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा.
2019 अॅशेस मालिका: हेडिंग्ले कसोटीत नाबाद 135 धावांची अविस्मरणीय खेळी.
2016, केपटाऊन कसोटी: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 258 धावांची कारकिर्दीतील सर्वोच्च खेळी.

follow us