इंडिया ए टीमने सराव सामन्यात दणक्यात सुरुवात; यूएसएचा 38 धावांनी उडवला धुव्वा

यूएसएचा मुख्य संघ इंडिया ए समोर 239 धावांचा पाठलाग करताना कुठवर मजल मारते? याकडं क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

  • Written By: Published:
News Photo   2026 02 02T221712.587

आयुष बडोनी याच्या नेतृत्वात इंडिया ए टीमने स्पर्धेतील (India) दुसऱ्या आणि आपल्या पहिल्या सराव सामन्यात यूएसएला 38 धावांनी लोळवलं आहे. इंडिया ए टीमने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सराव सामन्यात दणक्यात सुरुवात केली. इंडिया ए टीमने यूएसएसमोर 239 धावांचं आव्हान ठेवलं होतं. यूएसएनेही प्रतिकार केला. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर 20 ओव्हरही पूर्ण करता आल्या नाहीत.

भारताने आयुष बडोनी याच्या नेतृत्वात यूएसएला 19.4 ओव्हरमध्ये 200 रन्सवर गुंडाळलं. भारताने अशाप्रकारे हा सामना आप्ल्या नावावर केला. या सामन्यात दोन्ही संघांनी एकूण 438 धावा केल्या. तसेच सामन्यात दोन्ही बाजूने 21 षटकार लगावण्यात आले.

भारताला इथवर पोहचवण्यात ओपनर एन जगदीशन याने प्रमुख भूमिका बजावली. तर कॅप्टन आयुष बदोनी यानेही योगदान दिलं. त्याचबरोबर दुखापतीनंतर परतलेल्या तिलक वर्मा यानेही ठिकठाक धावा करत आपण मुख्य स्पर्धेसाठी फिट असल्याचं दाखवून दिलं. आता यूएसएचा मुख्य संघाची इंडिया ए समोर 239 धावांचा पाठलाग करताना दमछाक झाली.

जगदीशन याने बॅटिंगने सर्वाधिक 103 धावांचं योगदान दिलं. कॅप्टन आयुष बडोनी याने अर्धशतक झळकावलं. तसेच तिलक वर्मा आणि प्रियांश आर्या यांनीही धावा जोडल्या. त्यानंतर रवी बिश्नोई याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. तसेच खलील अहमद आणि नमन धीर या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवून यूएसएला गुंडाळण्यात योगदान दिलं.

इंडिया ए टीमची फटकेबाजी

भारताला 238 धावांपर्यंत पोहचवण्यात पहिल्या 4 फलंदाजांनी प्रमुख योगदान दिलं. एन जगदीशन याने शतक झकावलं. आयुष बदोनी याने अर्धशतकी खेळी केली. तर प्रियांश आर्या आणि तिलक वर्मा या दोघांनी सन्मानजनक धावा केल्या.

यूएसएने टॉस जिंकला

यूएसएने टॉस जिंकून भारताला बॅटिंगसाठी भाग पाडलं. प्रियांश आर्या आणि एन जगदीशन ही सलामी जोडी मोठी भागीदारी करण्यात अपयशी ठरली. यूएसएने भारताला 43 धावांवर पहिला झटका दिला. प्रियांश आर्या 28 धावा करुन माघारी परतला. त्यानंतर एन जगदीशन आणि तिलक वर्मा या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी धमाका केला. भारताला 238 धावांपर्यंत पोहचवण्यासाठी या जोडीने भागीदारीबाबत प्रमुख भूमिका बजावली. या दोघांनी 55 चेंडूत 113 धावांची भागीदारी केली. तिलक वर्मा 24 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 3 फोरसह 38 रन्स केल्या.

जगदीशनने कॅप्टन बडोनीसह तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागारी केली. जगदीशनने या दरम्यान अवघ्या 49 चेंडूत शतक केलं. तर आयुषने अर्धशतक झळकावलं. मात्र जगदीशन शतकानंतर आऊट झाला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 35 बॉलमध्ये 73 रन्सची पार्टनरशीप केली. जगदीशनने 55 बॉलमध्ये 11 फोर आणि 4 सिक्ससह 104 रन्स केल्या. तर आयुष आणि रियान पराग ही जोडी नाबाद परतली. आयुषने 26 बॉलमध्ये 6 फोर आणि 4 सिक्ससह नॉट आऊट 60 रन्स केल्या. तर रियान पराग याने 2 धावा जोडल्या. यूएसएसाठी शुभम रांजने, अली खान आणि जसदीप सिंह या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

 

Tags

follow us