बुमराह आणि पंड्या बाहेर अन् ‘या’ स्टार खेळाडूची एन्ट्री? जाणून घ्या नेदरलँड्सविरुद्ध भारताची प्लेइंग 11
IND vs NED : टी20 विश्वचषक 2026 स्पर्धेत आपला शेवटाचा ग्रुप सामना खेळण्यासाठी भारतीय संघ आज मैदानात उतरणार आहे. भारतीय संघाने या स्पर्धेत
IND vs NED : टी20 विश्वचषक 2026 स्पर्धेत आपला शेवटाचा ग्रुप सामना खेळण्यासाठी भारतीय संघ आज मैदानात उतरणार आहे. भारतीय संघाने या स्पर्धेत पाकिस्तानचा पराभव करत सुपर 8 मध्ये जागा फिक्स केली आहे. तर आज आपला शेवटा ग्रुप सामना नेदरलँड्सविरुद्ध भारतीय संघ खेळणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात काही बदल पाहायला मिळू शकतात. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, या सामन्यासाठी मोहम्मद सिराजला भारतीय संघात जागा मिळू शकते तर हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराहला विश्रांती दिली जाऊ शकते.
प्लेइंग 11 मध्ये बदल होणार?
सुपर 8 पूर्वी भारतीय संघ (Team India) आजच्या सामन्यात काही बदल करु शकतो. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांना विश्रांती दिली जाऊ शकते. बुमराह आता थेट सुपर 8 टप्प्यात खेळू शकतो. जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद सिराजला (Mohammed Siraj) पुन्हा एकदा प्लेइंग 11 मध्ये समाविष्ट केले जाऊ शकते. अमेरिकेविरुद्ध त्याने उल्लेखनीय कामगिरी केली होती. कॅप्टन सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर देखील हार्दिक पंड्याला (Hardik Pandya) विश्रांती देऊ शकतात.हार्दिक पंड्याऐवजी वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळू शकते.
तर दुसरीकडे कुलदीप यादवच्या (IND vs NED) जागी अर्शदीप सिंग परत येऊ शकतो, ज्यामुळे संघात दोन वेगवान गोलंदाज उपलब्ध होतील. शिवम दुबे अर्शदीप आणि सिराजला देखील मदत करू शकतात. फिरकी विभागाची जबाबदारी वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांच्यावर असेल.
मोठी बातमी, भारतासह अनेक देशांमध्ये YouTube Down
भारताचे संभाव्य प्लेइंग 11
इशान किशन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल (उपकर्णधार), वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.
मोठी बातमी : उच्च न्यायालयाच्या स्थगितीनंतर 5 टक्के मुस्लिम आरक्षणाचा शेवट
