IND vs NZ : भारताचा विक्रमी धावांचा पाठलाग ! न्यूझीलंडला धूळ चारली; नमन धीरची मॅच विनिंग खेळी
IND vs NZ 1st T20I: नमन धीरने (Naman Dhir) अवघ्या 15 चेंडूंत नाबाद 42 धावांची स्फोटक खेळी केलीय.
IND vs NZ 1st T20I : भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या (IND vs NZ) पहिल्या टी-20 सामन्यात विक्रमी धावांचा पाठलाग करत 4 गड्यांनी दणदणीत विजय मिळविला आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 226 धावांचे लक्ष्य गाठत भारतीय संघाने इतिहास रचलाय. नमन धीरने (Naman Dhir) अवघ्या 15 चेंडूंत नाबाद 42 धावांची स्फोटक खेळी केलीय. त्यात 5 चौकार आणि दोन षटकारांचा समावेश आहे. धडाकेबाज खेळी करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
भारताची मालिकेत 1-0 अशी आघाडी
भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना जिंकत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात संजू सॅमसनने आक्रमक फलंदाजी करत विजयाचा पाया रचला, तर अखेरच्या टप्प्यात नमन धीरने तुफानी फटकेबाजी करत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. कर्णधार श्रेयस अय्यरनेही नमनला मोलाची साथ दिली.
संजूचे धुव्वाधार अर्धशतक !
संजू सॅमसनने अवघ्या 33 चेंडूंत 67 धावांची खेळी केली. त्याने पॉवरप्लेमध्ये आक्रमक फलंदाजी करत केवळ 23 चेंडूंत अर्धशतक झळकविले. श्रेयस अय्यरनेही 28 चेंडूंत 42 धावा करत संघाच्या विजयात योगदान दिले.
4️⃣2️⃣* Runs
1️⃣5️⃣ Balls
2️⃣8️⃣0️⃣ Strike Rate
5️⃣ Fours & 2️⃣ SixesHow good was that match-winning finish from Naman Dhir? 👇
Scorecard ▶️ https://t.co/ADfFnxXGzz
#TeamIndia | #NZvIND https://t.co/4PgLm8Rbim
— BCCI (@BCCI) October 22, 2026
यापूर्वी भारताने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंडविरुद्धच 209 धावांचा पाठलाग केला होता. परदेशातील भारतीय संघाचा याआधीचा सर्वोत्तम धावांचा पाठलाग 2020 मध्ये ऑकलंड येथे 204 धावांचा होता. आता 226 धावांचे लक्ष्य गाठत टीम इंडियाने स्वतःचाच विक्रम मोडला.
टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचा यशस्वी पाठलाग
209 धावा: विरुद्ध ऑस्ट्रेलिया, विशाखापट्टणम, 2023
209 धावा: विरुद्ध न्यूझीलंड, रायपूर-2026
208-विरुद्ध वेस्ट इंडिज, हैदराबाद-2019
207-विरुद्ध श्रीलंका, मोहाली-2009
204 धावा: विरुद्ध न्यूझीलंड, ऑकलंड, 2020
202 धावा: विरुद्ध ऑस्ट्रेलिया, राजकोट, 2013