IND vs NZ : क्राइस्टचर्चमध्ये भारतीय संघ अडचणीत; केएल राहुलसह सहा फलंदाज बाद
IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु असणाऱ्या दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात भारतीय संघ बॅकफूटवर आला आहे.
IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु असणाऱ्या दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात भारतीय संघ बॅकफूटवर आला आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी यजमान न्यूझीलंडच्या 356 धावांच्या प्रत्युत्तरात, भारताने पहिल्या डावात 46 षटकांत 6 बाद 116 धावा केल्या आहेत. भारत अजूनही 240 धावांनी पिछाडीवर आहे. ध्रुव जुरेल 45 चेंडूत 7 धावा करून नाबाद आहे. अवघ्या 104 धावांत भारताचे पाच फलंदाज तंबूत परतले होते.
भारताने आपल्या पहिल्या डावात अवघ्या 59 धावांवर 3 विकेट्स गमावले होते. सलामीवीर यशस्वी जैस्वालला खातेही उघडता आले नाही. मॅट हेन्रीने त्याला पहिल्याच षटकात बाद केले.
काईल जेमिसनने देवदत्त पडिक्कल (20 चेंडूत 21 धावा) आणि कर्णधार शुभमन गिल (29 चेंडूत 17 धावा) यांना बाद केले. यष्टिरक्षक ऋषभ पंत (39 चेंडूत 23 धावा) देखील मोठी खेळी करू शकला नाही आणि तिसऱ्या सत्रात जेकब डफीचा बळी ठरला. पंतने चौथ्या विकेटसाठी केएल राहुलसोबत 37 धावांची भागीदारी केली होती. राहुल 80 चेंडूत 25 धावा करून बाद झाला तर दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर वॉशिंग्टन सुंदर (60 चेंडूत 10 धावा) नॅथन स्मिथचा बळी ठरला.
न्यूझीलंडचा डाव 356 धावांवर संपला
न्यूझीलंडचा पहिला डाव 116.3 षटकांत 356 धावांवर संपुष्टात आला. शनिवारी यजमान संघाने 5 विकेट्स गमावून 110 धावांची भर घातली. न्यूझीलंडसाठी टॉम ब्लंडेल सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने 211 चेंडूत 89 धावांची खेळी केली, ज्यामध्ये 10 चौकारांचा समावेश होता. भारतीय वेगवान गोलंदाज आकाश दीपने पाच विकेट्स मिळवले. त्याने 31.3 षटकांत 99 धावा दिल्या. अंशुल कंबोज आणि गुरनूर ब्रार यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतले, तर वॉशिंग्टन सुंदरने एक विकेट मिळवला.
Stumps on Day 2.
#TeamIndia reach 116/6 at close of play, trailing by 240 runs.
Action resumes tomorrow at 3:30 AM IST.
Scorecard ▶️ https://t.co/6iCwvH4Zap
#NZvIND https://t.co/jMKsWtfdfR
— BCCI (@BCCI) November 28, 2026
पहिल्या दिवशी अत्यंत संयमाने फलंदाजी करणाऱ्या ग्लेन फिलिप्सला (67 चेंडूत 37 धावा) आज आपल्या कालच्या धावसंख्येत कोणतीही भर घालता आली नाही. त्याने टॉम ब्लंडेलसोबत अर्धशतकी भागीदारी केली होती. ब्लंडेल आणि नॅथन स्मिथ (45 चेंडूत 26 धावा) यांनी सातव्या विकेटसाठी 44 धावा जोडल्या. काईल जेमिसनने 26 चेंडूत 19 धावा केल्या. दुसऱ्या सत्रात, भारताने ब्लंडेल आणि मॅट हेन्री (25 चेंडूत 19 धावा) यांना बाद करून न्यूझीलंडचा डाव संपुष्टात आणला.
अभिनेता जिमी शेरगिल आणि प्रनूतन बहलची दमदार एन्ट्री; ‘प्यादे’चा ट्रेलर-