IND vs NZ : वेलिंग्टन टेस्ट, पहिल्या दिवशी न्यूझीलंडचे वर्चस्व ; हेन्नी निकोल्सची शानदार फलंदाजी

IND vs NZ : न्यूझीलंड आणि भारत यांच्यात सुरु असणाऱ्या दोन कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात वेलिंग्टनच्या बेसिन रिझर्व्हवर सुरु असून

  • shakir sayyad
  • Written By: Published:
IND Vs NZ

IND vs NZ : न्यूझीलंड आणि भारत यांच्यात सुरु असणाऱ्या दोन कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात वेलिंग्टनच्या बेसिन रिझर्व्हवर सुरु असून या सामन्याच्याा पहिल्या दिवशी न्यूझीलंडच्या फलंदाजानी शानदार फलंदाजी करत भारताला बॅकफूटवर नेले आहे. भारतीय संघाने टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम गोलंदाजी करताना भारतीय गोलंदाजांनी अवघ्या 70 धावावर न्यूझीलंडचे 5 विकेट्स घेतल्या होत्या मात्र यानंतर न्यूझीलंडने शानदार पुनरागम करत पहिल्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस आपली स्थिती अधिक मजबूत केली आहे.

प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडची (New Zealand) सुरुवात अत्यंत खराब झाली. कर्णधार टॉम लॅथम (Tom Latham) पहिल्याच षटकात बाद झाला, तर डेव्हॉन कॉनवे केवळ 4 धावा करून माघारी परतला. यानंतर रचिन रवींद्रही अवघ्या 15 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. डॅरिल मिचेलही स्वस्तात बाद झाल्यामुळे न्यूझीलंडची स्थिती अत्यंत बिकट झाली होती. तर यष्टिरक्षक-फलंदाज टॉम ब्लंडेल 5 धावा करून बाद झाला. मात्र, हेन्री निकोल्स (Henry Nicholls) आणि ग्लेन फिलिप्स (Glenn Phillips) यांनी भागीदारी करत दुसऱ्या सत्राच्या अखेरीस न्यूझीलंडची धावसंख्या 5 बाद 140 पर्यंत पोहोचवली. निकोल्सला साथ देताना ग्लेन फिलिप्सनेही उत्कृष्ट फलंदाजी केली. दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडने 82 षटकांत 5 बाद 243 धावा केल्या होत्या.

सोनं खरेदी करताय? सावधान! 22 कॅरेटच्या नावाखाली 20 कॅरेट सोन्याची विक्री; भेसळीचा नवा प्रकार उघड

हेन्री निकोल्स 221 चेंडूंमध्ये 113 धावा करून खेळत आहे. त्याच्या या खेळीत 14 चौकारांचा समावेश आहे. दुसरीकडे, ग्लेन फिलिप्सही 94 धावांवर नाबाद असून, त्यांनी आतापर्यंत 13 चौकार लगावले आहेत. पहिल्या दिवशी वॉशिंग्टन सुंदर किंवा प्रसिद्ध कृष्णा, कोणालाही विकेट्स घेता आल्या नाहीत. भारताकडून जसप्रीत बुमराहने 3 तर आकाश दीप आणि अंशुल कंबोज यांनी एक- एक विकेट घेतला.

follow us