IND vs SL : पहिला दिवस भारताच्या नावावर, पडिक्कलचे शानदार शतक; श्रीलंकेच्या गोलंदाजांना फोडला घाम
IND vs SL : भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरु असणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना आजपासून गॉल येथे खेळला जात आहे.
IND vs SL : भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरु असणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना आजपासून गॉल येथे खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांनी शानदार कामगिरी करत श्रीलंकेच्या गोलंदाजांना घाम फोडले आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने 8 विकेट गमावून 288 धावा केल्या आहेत. दिवसाचा खेळ थांबला तेव्हा पडिक्कल 178 चेंडूंत 131 धावांवर, तर यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत 36 चेंडूंत 27 धावांवर खेळत होता. श्रीलंकेकडून प्रभातने एक विकट घेतला.
कर्णधार शुभमन गिलने (Shubman Gill) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या सत्रात भारताची धावसंख्या 1 बाद 101 अशी होती. केएल राहुल (KL Rahul) आणि यशस्वी जैस्वालने (Yashasvi Jaiswal) शानदार फलंदाजी केली मात्र 32 धावांवर खेळत असताना जैस्वाल धावबाद झाला. यानंतर भारतीय संघात कमबॅक करणारा देवदत्त पडिक्कलने शतक झळकावलेय तर केएल राहुल 77 धावांवर दुखापतीमुळे मैदानाबाहेर (रिटायर्ड हर्ट) गेला. भारतीय कर्णधार शुभमन गिल 16 धावांवर बाद झाला आहे.
Stumps on Day 1 in Galle! 🏟️
Fifty partnership up between Devdutt Padikkal & Rishabh Pant 🤝
A fine opening day of the First #SLvIND Test for #TeamIndia as they reach 288/2 after 73 overs 👌👌
See you tomorrow for Day 2 action.
Scorecard ▶️ https://t.co/M9LVyCAp8y pic.twitter.com/kI0J3sQSZJ
— BCCI (@BCCI) August 15, 2026
पडिक्कलचे शानदार पुनरागमन; शतक झळकावले
2024 मध्ये पर्थ येथे आपला शेवटचा कसोटी सामना खेळणारा देवदत्त पडिक्कलने (Devdutt Padikkal) भारतीय संघात पुनरागमन करत शतक झळकावले. त्याने 134 चेंडूमध्ये आपला पहिला कसोटी शतक पूर्ण केला. 2002 नंतर भारतीय संघासाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना कसोटी शतक ठोकणारा पडिक्कल हा दुसरा डावखुरा फलंदाज ठरला आहे. 2002 मध्ये दिल्ली येथे झिम्बाब्वेविरुद्ध सौरव गांगुलीने 136 धावांची खेळी केली होती.
MAIDEN TEST HUNDRED! 💯
A special moment on a special day for Devdutt Padikkal in Galle 🥳
Updates ▶️ https://t.co/M9LVyCAp8y#TeamIndia | #SLvIND pic.twitter.com/8x1HcYeFbA
— BCCI (@BCCI) August 15, 2026
भारताची प्लेइंग इलेव्हन
यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, कुलदीप यादव, मानव सुथार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
श्रीलंकेची प्लेइंग इलेव्हन
लाहिरू उदारा, निशान मदुष्का, दिनेश चंडिमल, कामिंदू मेंडिस, धनंजय डी सिल्वा (कर्णधार), सोनल दिनुशा, निरोशन डिकवेला (यष्टीरक्षक), केशरा नुवानथा, प्रभात जयसूर्या, लाहिरू कुमारा, असिथा फर्नांडो.