IND vs SA: भारताचा केपटाऊनमध्ये कसोटी जिंकण्याचा पहिल्यांदाच पराक्रम, मालिकाही बरोबरीत सोडली

  • Written By: Published:
IND vs SA: भारताचा केपटाऊनमध्ये कसोटी जिंकण्याचा पहिल्यांदाच पराक्रम, मालिकाही बरोबरीत सोडली

IND vs SA: केपटाऊन ( Cape Town) कसोटीच्या (Test Series) पहिल्या डावात भारताचा (India) संघ 153 धावांत गारद झाला होता. त्यात 11 चेंडूत सहा फलंदाज भोपळाही फोडू न शकल्याने भारतीय संघ टीकेचा धनी झाला होता. परंतु रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने केपटाऊन कसोटी दक्षिण आफ्रिकेला (South Africa) सात विकेटने धूळ चारत मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे महेंद्रसिंह धोनीनंतर रोहित शर्मा हा दक्षिण आफ्रिकेच्या भूमीत कसोटी मालिका अर्निणित राखण्यात यशस्वी ठरला आहे.

‘आधी अनधिकृत आता अधिकृतपणे फोन टॅप होणार’; शुक्लांची नियुक्ती होताच खडसेंचा आरोप

दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर 79 धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताने हे लक्ष्य तीन गड्यांच्या मोबदल्यात गाठले. ही कसोटी अवघ्या दोन दिवसांत संपली. त्यात दोन्ही संघातील गोलंदाजांची बोलबाला राहिला. मोहम्मद सिराजने पहिल्या डावात सहा, आणि जसप्रीत बुमराहने दुसऱ्या डावात सहा बळी घेत भारताला दणदणीत विजय मिळवून दिला आहे. या कसोटीत सिराजने सात आणि बुमराहने आठ बळी घेतले आहेत. बुमराह हा मालिकावीर ठरला आहे.

LetsUpp Special : शरद पवारांना फक्त सहा जागा; नाना पटोले, थोरात आगीशी खेळतायेत?

पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी आफ्रिकेचा संघ अवघ्या 55 धावांत गुंडाळला होता. तर भारताने पहिल्या डावात 153 धावा करत आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावात आफ्रिकेचा संघ 176 धावांवर तंबूत परतला. त्यामुळे भारताला विजयसाठी अवघ्या 79 धावांची गरज होती.


मार्करमचे झुंजार शतक

या सामन्याच्या दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांच्या धारदार गोलंदाजीसमोर आफ्रिकेची फलंदाजी अपयशी ठरली. दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांचे वर्चस्व दिसून आले. या गोलंदाजीसमोर आफ्रिकेचा डाव गडगडला. एकही फलंदाज मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. त्यामुळे अवघ्या 176 धावांवर अख्खा संघ गारद झाला. आफ्रिकेकडून एडन मार्करमने मात्र झुंजार खेळी करत 106 धावांची खेळी केली. इतर फलंदाज खास काही करू शकले नाहीत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube