IPL 2026 Final: हॉटेलची रुम तीस हजारांना, विमान तिकीट 38 हजारांवर; अहमदाबादमध्ये दर गगनाला !

IPL 2026 Final- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bengaluru) आणि गुजरात टायटन्स ( Gujarat Titans) हे संघ विजेतेपदासाठी झुंजणार आहे.

  • Written By: Published:
RCB AND GT IPL FINAL 2026

RCB VS GT: आयपीएल 2026 च्या अंतिम सामन्यासाठी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम सज्ज झालंय आहे. आयपीएल फायनलची (
IPL 2026 Final) लढत रविवारी 31 मे रोजी होत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bengaluru) आणि गुजरात टायटन्स ( Gujarat Titans) हे संघ विजेतेपदासाठी झुंजणार आहे. या सामन्यामुळे अहमदाबादमध्ये मोठी आर्थिक उलाढाल होत आहे. फायनल पाहण्यासाठी देशभरातील क्रिकेटप्रेमी येत आहे. त्यामुळे येथील हॉटेल्सचे दर, विमान तिकीटेही प्रचंड महागली आहेत. ( IPL 2026 Final Hotel room for 30 thousand, flight ticket for 38 thousand; Prices skyrocket in Ahmedabad!)

सुट्टा सोडा अन् सुट्ट्या घ्या! सिगरेट न ओढणाऱ्यांना मिळणार वर्षभरात अतिरिक्त 6 सुट्ट्या…

हॉटेल दरांमध्ये मोठी वाढ
शनिवारीच अहमदाबादमधील बहुतेक प्रीमियम हॉटेल्स हाऊसफुल झाली आहेत. हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र सोमानी यांच्या मते सुट्टीचा कालावधी आणि आयपीएल अंतिम सामन्याची उत्सुकता यामुळे हॉटेल उद्योगाला सुमारे 150 ते 200 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळण्याची शक्यता आहे. सध्या अहमदाबादमध्ये सुमारे 200 तीन-तारांकित आणि पाच-तारांकित हॉटेल्स आहेत. या हॉटेलमध्ये जवळपास 20 हजार खोल्या उपलब्ध आहेत. मात्र अंतिम सामन्यामुळे सर्व खोल्या बुक होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

कोकण विधानपरिषद निवडणुकीची लढत महायुतीत; तटकरेंविरोधात शिंदेंच्या आमदारच्या कन्या रिंगणात ?

सामान्यतः 8 ते 10 हजार रुपये असलेले हॉटेल रूमचे दर आता 25 ते 30 हजार रुपयांपर्यंत गेले आहेत. सामना पाहण्यासाठी येणाऱ्या बहुतेक क्रिकेटप्रेमींना किमान एक दिवस मुक्काम करावा लागणार आहे. या दरांमध्ये आणखी 20 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. विशेषतः मोटेरा, चांदखेडा, एसजी हायवे आणि गांधीनगर परिसरातील हॉटेल्सला सर्वाधिक मागणी आहे.


विमान तिकिटांचे दरही वाढले

देशभरातून हजारो चाहते अहमदाबादकडे रवाना होत आहे. त्यामुळे विमान तिकिटांच्या किमतींमध्येही मोठी वाढ झाली आहे. साधारणपणे 7,000 ते 8,000 रुपये असलेले विमानभाडे आता 38,000 रुपयांपर्यंत पोहोचले आहे. याशिवाय रेल्वे आणि बस तिकिटांची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.


क्रीडा आणि मनोरंजन उद्योगामुळे अर्थव्यवस्थेला चालना

अहमदाबादसाठी मोठ्या क्रीडा स्पर्धा आणि संगीत मैफिली आता केवळ कार्यक्रम राहिलेले नाहीत, तर ते शहराच्या अर्थव्यवस्थेला गती देणारे महत्त्वाचे माध्यम बनले आहेत. मोठ्या कार्यक्रमांमुळे स्थानिक व्यवसायांना चालना मिळते, रोजगारनिर्मिती होते आणि शहराच्या पर्यटन क्षेत्रालाही फायदा होतो.

हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशनचे नरेंद्र सोमानी म्हणाले. भविष्यात अहमदाबादमध्ये कॉमनवेल्थ स्पर्धा आणि ऑलिम्पिक स्पर्धांच्या आयोजनासाठीही प्रयत्न सुरू आहेत. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सातत्याने मोठ्या स्पर्धा होत असल्याने अनेक नवीन हॉटेल ब्रँड्स शहरात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे आगामी काळात शहरातील हॉटेल्स आणि निवास क्षमतेत दुपटीने वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

follow us