कोकण विधानपरिषद निवडणुकीची लढत महायुतीत; तटकरेंविरोधात शिंदेंच्या आमदारच्या कन्या रिंगणात ?
Konkan Vidhan Parishad-जुईली जुईकर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.
Konkan Vidhan Parishad: कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघाच्या (kan Vidhan Parishad) निवडणुकीत आता नवा राजकीय ट्विस्ट निर्माण झाला आहे. कारण शिंदे शिवसेनेचे अलिबाग-मुरूडचे आमदार महेंद्र दळवी (Mahendra Dalvi) यांच्या कन्या जुईली दळवी-जुईकर (Juili Dalvi) यांनी या मतदारसंघावर शिवसेनेचाच दावा करत उमेदवारीची तयारी सुरू केलीय. ही जागा महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसला सुटणार असल्याचे निश्चित झाले आहे. खासदार सुनील तटकरे यांचा मुलगा अनिकेत तटकरे (Aniket Tatkare) हे उमेदवार असणार आहेत. त्यामुळे जुईली जुईकर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादी (ncp) विरुद्ध शिवसेना (Shivsena) असा राजकीय संघर्ष होऊ शकतो.
न्यायालयाच्या कसोटीवर टिकणारेच निर्णय घेऊ; मराठा आरक्षणाबाबत फडणवीसांचे आश्वासन
कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघासाठी महायुतीतील घटक पक्षांमध्ये रस्सीखेच आहे. त्यात शिंदे शिवसेनेच्या जुईली जुईकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमध्ये शिवसेनेचे संख्याबळ अधिक असल्याचा दावा करत हा मतदारसंघ शिवसेनेलाच मिळायला हवा, अशी मागणी त्यांनी केली. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींच्या पाठिंब्याच्या जोरावर शिवसेनेचा या जागेवर नैसर्गिक हक्क असल्याचे त्यांनी म्हटले.
महिला उमेदवार म्हणून आपण या निवडणुकीसाठी सक्षम असल्याचा विश्वासही जुईकर यांनी व्यक्त केला. महायुतीत अद्याप जागावाटपाबाबत अंतिम निर्णय झालेला नसल्याने आपण अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. महायुतीमध्ये शिवसेनेवर अन्याय होत असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये असल्याचे नमूद करत रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील शिवसैनिकांची ही जागा शिवसेनेला देण्याची मागणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अनिकेत तटकरे
महायुतीतील भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक मतदार, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींशी वरिष्ठ पातळीवर झालेल्या चर्चेनंतर अनिकेत तटकरे यांच्या नावाला सर्वाधिक पसंती मिळाल्याचे समजते. आता त्यांच्या उमेदवारीची केवळ अधिकृत घोषणा बाकी असल्याचे स्पष्ट केले आहे.
भरत गोगावले रायगडचे पालकमंत्री ?
शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले आणि राष्ट्रवादीच्या मंत्री अदिती तटकरे यांच्यामध्ये रायगडच्या पालकमंत्रीपदावरून राजकीय संघर्ष आहे. परंतु आता रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांना देण्याचा निर्णय येणार आहे. त्याबदल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांना विधान परिषद उमेदवारी देण्याचा फॉर्म्युला महायुतीने स्वीकारल्याची जोरदार जोरदार चर्चा आहे.