Mahrashtra Kesari 2026: महाराष्ट्र केसरीच्या मानाचा गदेसाठी महेंद्र गायकवाड आणि हर्षवर्धन सदगीर लढणार

Mahrashtra Kesari 2026

  • Written By: Published:
Mahendra Gaikwad

Mahrashtra Kesari 2026 : महाराष्ट्र केसरीच्या मानाच्या गदेसाठी सोलापूरचा महेंद्र गायकवाड आणि नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरमध्ये लढत होणार आहे. ही लढत गादी (मॅटवर) होणार आहे. गायकवाडने माती विभागात सिकंदर शेखला, तर गादी विभागात हर्षवर्धन सदगीरने सोलापूरच्या जयदीप पाटीलला पराभव केलाय. काही वेळात महाराष्ट्र केसरीसाठी लढत होईल.

माती विभागातील अंतिम लढत सोलापूरच्या महेंद्र गायकवाड आणि हिंगोलीच्या सिंकदर शेख यांच्यात झाली. महेंद्र गायकवाडने सुरुवातीला दोन गुण घेतले. त्यानंतर महेंद्रने एक गुण घेत पहिल्या फेरीत तीन गुणाची आघाडी घेतलीय. दुसऱ्या फेरीत सिंकदरने पट काढण्याचा प्रयत्न केला. पण तो यशस्वी झाला नाही. त्यामुळे बाहुबली महेंद्र गायकवाडने 3-० ने आघाडी घेतली आणि विजेतपद पटकाविले आहे. गादी विभागाच्या अंतिम फेरीत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने सोलापूरच्या जयदीप पाटीलचा सहज पराभव केला. त्यानंतर महेंद्र गायकवाड आणि हर्षवर्धन सदगीरमध्ये महाराष्ट्र केसरीच्या मानाच्या गदेसाठी गादीवर लढत होणार आहे. सदगीरने 2020 ची 63 वी महाराष्ट्र केसरी जिंकलेली आहे.

follow us