आयसीसीच्या इशाऱ्यानंतर टी-20 वर्ल्डकपवर बहिष्कार टाकणाऱ्या पाकचा संघ जाहीर पण बांगलादेशसाठी हातावर…
Pakistan ने आपला संघ जाहीर केला आहे. मात्र पाकिस्तान यामध्ये बांगलादेशच्या समर्थनार्थ हातावर काळ्या पट्ट्या बांधून मैदानात उतरणार आहे.
Pakistan announces squad for T20 World Cup boycott after ICC warning, but will wear black armbands for Bangladesh : पुढील महिन्यात सुरु होणाऱ्या टी20 विश्वचषक 2026 पूर्वी आयसीसीने मोठा निर्णय घेत बांगलादेशला या स्पर्धेतून बाहेर केले आहे. आयसीसीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आता या स्पर्धेत बांगलादेशच्या जागी स्कॉटलंडला जागा देण्यात आली आहे. तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान देखील या स्पर्धेतून माघार घेणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर जोराने सुरु होती. मात्र आता अखेर आयसीसीने दिलेल्या इशाऱ्यानंतर पाकिस्तानने आपला संघ जाहीर केला आहे. मात्र पाकिस्तान यामध्ये बांगलादेशच्या समर्थनार्थ हातावर काळ्या पट्ट्या बांधून मैदानात उतरणार आहे.
पाकचा संघ जाहीर पण बांगलादेशसाठी हातावर…
दरम्यान पाकिस्तानच्या विश्वचषकातील सहभागाबद्दल अद्यापही निश्चितला नसली तरी त्यांच्या या संभाव्य कृतीमुळे आयसीसीच्या अडचणी वाढल्या आहेत. दुसरीकडे बांगलादेशच्या समर्थनार्थ पाकिस्तानी संघ अशाप्रकारे मैदानात काळ्या पट्ट्या बांधून मैदानात उतरणार असेल तर यावर आयसीसी काय कारवाई करणार? याच्या देखील चर्चा रंगू लागल्या आहेत.
महाराष्ट्र 59 वा वार्षिक निरंकारी संत समागम; भव्य शोभा यात्रेने झाला प्रारंभ
आयसीसीच्या नियमानुसार एखाद्या खेळाडूने किंवा संघाने पूर्वपरवानगीशिवाय आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये अशाप्रकारे हातावर काळी पट्टी किंवा इतर कोणतेही चिन्ह घातले तर ते नियमांचे उल्लंघन मानलं जातं. यापूर्वी 2023 मध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडू उस्मान ख्वाजाला परवानगीशिवाय हातावर काळी पट्टी बांधल्याबद्दल आयसीसीने कारवाईचा इशारा दिला होता. त्यामुळे जर पाकिस्तानी संघाने बांगलादेशच्या समर्थनार्थ अशाप्रकारे काळीपट्टी बांधली तर पाकिस्तानी खेळाडूंना त्यांच्या सामन्याच्या तिच्या 25% दंड आकारला जाऊ शकतो असे देखील सांगितले जात आहे.
