पाकिस्तानला सातवा धक्का, टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर

पाकिस्तानच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा याने फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.

  • Written By: Published:
News Photo   2026 02 15T204301.652

176 धावांचं आव्हान

टीम इंडियाने पाकिस्तानसमोर 176 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारताने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 175 धावा केल्या. भारतासाठी इशान किशन याने सर्वाधिक 77 धावा केल्या. तर सूर्यकुमार यादव याने 32 धावांचं योगदान दिलं. शिवम दुबे याने 27 तर तिलक वर्मा याने 25 धावांचं योगदान दिलं. तर पाकिस्तानसाठी सॅम अयुब याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या.

ड टु हेड रेकॉर्ड्स

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात एकूण 8 सामने खेळवण्यात आले आहेत. भारताने या 8 पैकी 7 सामने जिंकले आहेत. तर पाकिस्तानला एकमेव सामना जिंकता आला आहे. तर एकूणच टी 20i क्रिकेटमध्ये दोन्ही संघात एकूण 16 सामने झाले आहेत. त्यापैकी भारताने 13 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर पाकिस्तानला 3 सामनेच जिंकता आले आहेत.

1 विरुद्ध 6

टीम इंडिया आणि पाकिस्तान हा सामना 1 विरुद्ध 6 अशी लढत आहे. टीम इंडिया आयसीसी टी 20I रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी आहे. तर पाकिस्तान सहाव्या क्रमांकावर विराजमान आहे.

टीम इंडियाचा ‘दस का दम

टीम इंडियाने आतापर्यंत आयसीसी टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत सलग 10 सामने जिंकले आहेत. भारताने नामिबिया आणि त्याआधी यूएसएवर मात केली आहे. तर भारताने टी 20I वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत खेळलेले सर्व 8 सामने जिंकले होते.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह.

पाकिस्तानचे 11 खेळाडू : सलमान आगा (कॅप्टन), सॅम अयुब, साहिबजादा फरहान, बाबर आझम, मोहम्मद नवाज, शादाब खान, फहीम अश्रफ, उस्मान खान (विकेटकीपर), शाहीन आफ्रिदी, अबरार अहमद आणि उस्मान तारीक.

LIVE NEWS & UPDATES

  • 15 Feb 2026 10:09 PM (IST)

    पाकिस्तानला नवावा धक्का, टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर

  • 15 Feb 2026 09:59 PM (IST)

    तिलक वर्माने काढली सातवी विकेट

    पाकिस्तानला शादाब खानच्या रुपाने सातवा धक्का बसला. तिलक वर्माने टाकलेल्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर त्याची विकेट पडली. उत्तुंग फटका मारण्याच्या नादात बाद झाला. आता भारतीय संघ विजयापासून तीन विकेट दूर आहे.

  • 15 Feb 2026 09:51 PM (IST)

    पाकिस्तानला मोहम्मद नवाजच्या रुपाने सहावा धक्का बसला आहे. कुलदीप यादवच्या गोलंदाजी मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. नवाज फक्त 4 धावा करून बाद झाला.

  • 15 Feb 2026 09:40 PM (IST)

    टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर, पाकिस्तानला सहावा धक्का

    पाचव्या विकेटसाठी जोडी जमली

    पाकिस्तानच्या चार विकेट पडल्यानंर उस्मान खानने बाजू सावरली आहे. फिरकीला चांगल्या पद्धतीने त्याने सामना केला आहे. त्यामुळे पाकिस्तानला अडचणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. तिलक वर्माने त्याचा झेल सोडल्याने टेन्शन वाढवलं आहे.

     

  • 15 Feb 2026 09:20 PM (IST)

    पाकिस्तानला चौथा धक्का, बाबर आझमचा खेळ खल्लास

    बाबर आझमच्या रुपाने पाकिस्तानला चौथा धक्का बसला आहे. अक्षर पटेलने चौथं यश मिळवून दिलं आहे. आक्रमक फटका मारण्याच्या नादात चुकला आणि त्रिफळा उडाला. बाबर आझम 5 धावा करून बाद झाला. पाकिस्तानचा संघ पावरप्लेमध्ये दडपणात आला आहे.

  • 15 Feb 2026 09:19 PM (IST)

    पाकिस्तानला पाचवा धक्का, बाबर अजम तंबूत परत

follow us