भारताला मोठा धक्का; संजू सॅमसनला सेमीफायनलसाठी येणार बंदी, कारण काय ?

Sanju Samson : आयसीसी टी20 2026 विश्वचषकातील सुपर 8 च्या सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध 97 धावांची खेळी खेळल्यानंतर सोशल मीडियावर संजू सॅमसन

Sanju Samson

Sanju Samson : आयसीसी टी20 2026 विश्वचषकातील सुपर 8 च्या सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध 97 धावांची खेळी खेळल्यानंतर सोशल मीडियावर संजू सॅमसन चर्चेत आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या त्याच्या शानदार खेळीच्या जोरावर भारतीय संघाने टी20 विश्वचषक 2026 च्या सेमीफायनमध्ये एन्ट्री केली आहे. भारताचा 5 मार्च रोजी मुंबईतील वानखडे मैदानावर इंग्लंडविरुद्ध सेमीफायनल सामना होणार आहे. मात्र या सामन्यासाठी आयसीसीकडून संजू सॅमसनवर बंदी घातली जाऊ शकते.

वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) झालेल्या सामन्यानंतर संजूने (Sanju Samson) सेलिब्रेशन करताना हेल्मेट फेकले होते. हे सेलिब्रेशन आता संजूसाठी आणि भारतासाठी त्रासदायक ठरू शकते. कारण अशा प्रकारचा सेलिब्रेशन खेळाडूंच्या वर्तनाबाबत आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन मानला जाऊ शकतो. त्यामुळे आयसीसी संजूवर एका सामन्याची बंदी घालू शकते. जर असं झालं तर हा भारतासाठी मोठा धक्का असणार आहे. तर दुसरीकडे संजू सॅमसनवर कारवाई होणार का? याबाबत आयसीसीकडून (ICC) कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

संजू सॅमसनची ऐतिहासिक खेळी

टी20 विश्वचषकाच्या सुपर 8 सामन्यात वेस्ट इंडिजने भारतासमोर 196 धावांचे लक्ष्य ठेवले होते मात्र भारताने पाचव्या षटकात 41 धावांवर अभिषेक शर्मा आणि इशान किशन या दोन फलंदाजांना गमावले. यानंतर संजू सॅमसनने प्रथम अभिषेक आणि इशान किशनसोबत आणि नंतर सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्यासोबत भागीदारी करून संघाला लक्ष्याच्या जवळ नेले. पंड्याच्या बाद झाल्यानंतर, संजूने शिवम दुबेसह भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला. संजूने त्याच्या डावात 12 चौकार आणि चार षटकार मारले.

दुबईत अडकलेल्या नागरिकांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्याकडून विशेष विमानाची व्यवस्था

टी20 विश्वचषकाच्या इतिहासात लक्ष्याचा पाठलाग करताना कोणत्याही भारतीयाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याने 50 चेंडूत नाबाद 97 धावा केल्या.

follow us